Google layoffs News :  या महागाईच्या काळात प्रत्येकाला आपली नोकरी टिकवायची आहे. प्रत्येकजण आपली नोकरी वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे.एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे महागाई वाढत आहे. अशा स्थितीत गुगलने हा निर्ण घेतला आहे. 

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय आहे?

खरं तर, गुगलने आपल्या क्लाउड विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढायला सुरुवात केल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन आठवड्यांत गुगल क्लाउडच्या अनेक टीम्समध्ये नोकरकपात झाली आहे. प्रभावित झालेल्या युनिट्समध्ये गूगल थ्रेट इंटेलिजन्स ग्रुपचा समावेश आहे, जो जागतिक हॅकिंग कारवायांवर संशोधन करतो आणि अहवाल प्रकाशित करतो.

अहवालानुसार, गुगलने 2022 मध्ये सायबर सुरक्षा कंपनी मॅंडियंटला 5.4 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले. या कर्मचारी कपातीचा परिणाम कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांवरही झाला आहे. कंपनीने अद्याप किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे, हे जाहीर केलेले नाही.

Continues below advertisement

कर्मचाऱ्याची पोस्ट

या बातमीला दुजोरा देण्यासाठी, गुगलच्या एका कर्मचाऱ्याने लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या कर्मचाऱ्यासह इतर अनेकांना त्यांच्या टीममधून कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने आपल्या भविष्यातील योजनांबद्दल लिहिले आहे, की तो थोड्या विश्रांतीनंतर नवीन नोकरी शोधेल.

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून 7 हजारांहून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचे नियोजन

स्टँडर्ड चार्टर्ड बँक येत्या चार वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत 7 हजारांहून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचं नियोजन करत आहे. बँक नफा वाढवण्यासाठी एआय आणि ऑटोमेशनचा वापर वाढवत आहे.  रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या बँकेचं मुख्यालय लंडनमध्ये असून बँक 2030 पर्यंत कॉर्पोरेट विभागांमधून जवळपास 15 टक्के पदं कमी करण्याचं नियोजन करत आहे.  

रॉयटर्सच्या अंदाजानुसार या पुनर्रचनेमुळं बँकेच्या 52 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांपैकी 7000 हून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत जगभरात 82 हजारांहून अधिक लोक काम करतात. बँकेचे सीईओ बिल विंटर्स यांच्या मतानुसार हे पाऊल खर्च कमी करण्यासाठी नसून तंत्रज्ञानाच्या बदलाचा भाग आहे. 

सीईओ बिल विंटर्स यांच्या मते लोकांना अधिकचं कौशल्य मिळवायचं असून त्यांना पुढं जायचं आहे. आम्ही त्यांना दुसऱ्या पदावर काम करण्याची पूर्ण संधी देत आहे. बँकेनं म्हटलं की काही कर्मचाऱ्यांना नव्या पदांसाठी प्रशिक्षित आणि शिफ्ट केलं जाणार आहे.