ESIC Recruitment 2025 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि त्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. ज्यामध्ये 243 पदांसाठीच्या भरतीसाठी अधिसूचना (ESIC Jobs 2025) जारी करण्यात आली आहे. यासाठी उमेदवार ESIC esic.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच हि निवड कशी होईल, त्यासाठी काय अटी आणि नियम आहेत ते जाणून घेऊया.
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 243 पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार esic.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. तसेच यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आपण 15 सप्टेंबरपूर्वी यासाठी अर्ज करू शकता.
किती पदांसाठी होणार आहे भरती?
सामान्य श्रेणी - 97 पदे
SC श्रेणी - 40पदे
ST श्रेणी - 18 पदे
OBC श्रेणी - 63 पदे
EWS श्रेणी - 25 पदे
अशी असेल शैक्षणिक पात्रतेची अट
पदवी प्राप्त केल्यानंतर वरिष्ठ निवासी म्हणून 3 वर्षांचा अध्यापन अनुभव.
वयोमर्यादा किती असावी:
सामान्य (पुरुष): कमाल वयोमर्यादा 40 वर्षे. ESIC मध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी वयात 5 वर्षांची सूट
कशी केली जाईल निवड?
निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
किती दिला जाईल पगार?
पे मॅट्रिक्स लेव्हल 11 नुसार, 67,700 रुपये - 2,08,700 रुपये
अर्ज शुल्क किती असेल?
सामान्य श्रेणी - 500 रुपये
महिला, अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, माजी सैनिक आणि ESIC कर्मचाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क नाही
अर्ज कसा करावा?
esic.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा आणि अर्ज फॉर्म डाउनलोड करा.
फॉर्म भरा आणि स्वतःची साक्षांकित कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जोडा.
फॉर्म एका लिफाफ्यात टाका आणि त्यावर 'वैद्यकीय संस्थांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज' असे लिहा.
स्पीड पोस्टने तो दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
महत्वाच्या बातम्या:
रेल्वेत नोकरीची मोठी संधी! 1010 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? किती मिळणार पगार?
(अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.)