DOT Engineer Recruitment 2023: DOT नं अभियंता पदासाठी भरती जारी केली आहे. येथे सब-डिव्हिजल इंजिनिअर पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. दूरसंचार विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या या भरतीसंदर्भात खास गोष्ट म्हणजे, 56 वर्षांपर्यंतचे उमेदवार भरती अंतर्गत पदांसाठी अर्ज करू शकतात. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करावेत. या रिक्त जागांच्या जाहिरातीचा क्रमांक – 2-6/2019-DGT/1 हा असून याच जाहीरातीमार्फत भरती जारी केली आहे.  


किती पदांवर भरती? 


या भरती मोहिमेद्वारे सब-डिव्हिजल इंजिनिअर पदाच्या एकूण 270 जागा भरण्यात येणार आहेत. सर्वात आधी इच्छुक उमेदवारांना रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल, त्यानंतर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. तपशील जाणून घेण्यासाठी, तुम्ही दूरसंचार विभागाची अधिकृत वेबसाईट dot.gov.in. ला भेट देऊ शकता. 


अर्ज करण्याची शेवटची तारीख 


DOT च्या या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे. अर्ज केल्यानंतर, दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पाठवावा लागेल. सोबत आवश्यक कागदपत्रं जोडणंही अनिर्वाय असणार आहे.  


अर्जासाठी पात्रता काय? 


DOT च्या सब-डिव्हिजल इंजिनिअर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE, B.Tech पदवी असणं आवश्यक आहे. ही पदवी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग इत्यादी विषयांमध्ये असावी. या पदांसाठी कमाल 56 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.


कशी होणार निवड? 


भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड लेखी चाचणी किंवा मुलाखतीद्वारे किंवा दोन्ही संपर्क विभागाच्या नियमांनुसार होईल. याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना 47,600 रुपये ते 1,51,100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.


'या' पत्त्यावर पाठवा अर्ज 


उमेदवार त्यांचे अर्ज 22 फेब्रुवारी 2023 पूर्वी अर्ज ADG – 1 (A & HR), DGT HQ, रूम नं. 212, UIDAI बिल्डिंग, काली मंदिराच्या मागे, नवी दिल्ली - 110001 वर पाठवू शकतात.  


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Job Majha : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज