देशाच्या राजधानीत नोकरी करण्याची मोठी संधी, पगार मिळणार दोन ते तीन लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती
जर तुम्हाला देशाची राजधानी दिल्लीत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) जनरल मॅनेजरच्या रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे.
Delhi Metro Job News : जर तुम्हाला देशाची राजधानी दिल्लीत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) जनरल मॅनेजरच्या रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. दिल्ली मेट्रोने जनरल मॅनेजर पदासाठी रिक्त जागा जाहीर केली आहे. या पदासाठी किमान 15 ते 20 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
पगार पॅकेज काय असेल?
दिल्ली मेट्रोमध्ये जनरल मॅनेजरची पद ही उच्च-स्तरीय व्यवस्थापन पद आहे. या पदाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पगार. जनरल मॅनेजरचा पगार दरमहा अंदाजे 1 लाख 20 हजार ते 2 लाख 80 हजार पर्यंत असू शकतो, म्हणजे वार्षिक पगार 1 कोटी 50 हजार 3 कोटी पर्यंत असू शकतो. त्यामुळं दिल्ली मेट्रोमध्ये जनरल मॅनेजरची पदासाठी मिळणारा पगार हा मजबुत असणार आहे. त्यामुळं ही नोकरीची मोठी संधी आहे.
हे भत्ते उपलब्ध असतील:
⦁ गृहनिर्माण किंवा घरभाडे भत्ता (HRA)
⦁ प्रवास भत्ता
⦁ वैद्यकीय सुविधा
⦁ पेन्शन आणि विमा लाभ
कोण अर्ज करू शकते:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल)
संबंधित क्षेत्रात 15 ते 20 वर्षांचा कामाचा अनुभव
मोठ्या प्रकल्पात, रेल्वे, केंद्र किंवा राज्य सरकारच्या पातळीवर काम करण्याचा अनुभव
संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान असणे आवश्यक आहे
अर्ज प्रक्रिया:
तुम्ही DMRC च्या अधिकृत वेबसाइट www.delhimetrorail.com ला भेट देऊन अर्ज भरू शकता
वेबसाइटवरील "करिअर" विभागात जा
जनरल मॅनेजर पदासाठी अधिसूचना डाउनलोड करा
अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (रिज्युम, अनुभव प्रमाणपत्र, फोटो इ.)
अर्ज सादर केल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
निवड प्रक्रिया कशी राहणार?
विशेषतः, जनरल मॅनेजर पदासाठी अर्जदारांना लेखी परीक्षेला बसण्याची आवश्यकता नाही. ही भरती मुलाखतीवर आधारित असेल. अर्जदारांची यादी तयार केली जाईल आणि त्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर त्यांची निवड केली जाईल. या पदासाठी वयोमर्यादा 55 ते 62 वर्षे आहे. दरम्यान जे उमेदवार पात्प आहेत, त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. कारण या पदांसाठी पगार देखील चांगला मिळणार आहे. त्यामुळं पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत असं आवाहन करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Kajol On 9 to 5 Job Employees: '9 ते 5 काम करणारे डेस्कवर बसतात, अॅक्टर्स जास्त मेहनत करतात...'; हे काय बोलून गेली काजोल?
























