Bank Job News : बँकेत नोकरी (Bank Job)  मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई (Maharashtra State Cooperative Bank Limited Mumbai) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 

Continues below advertisement


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 17 जुलै 2025 पासून सुरुवात झाली असून शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2025 आहे.


एकूण रिक्त जागा : 167


रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या


ज्युनिअर श्रेणी अधिकारी - 44
असोसिएट - 50
टंकलेखक - 9
वाहनचालक - 6
शिपाई - 58


शैक्षणिक पात्रता काय?



  • कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान 50 टक्के गुणांसह असावा आणि मॅट्रिकची परीक्षा मराठी विषयांसह उत्तीर्ण असावा. कायद्यात बॅचलर/मास्टर्स किंवा JAIIB/CAIIB/MSCIT प्रमाणपत्र पूर्ण केलेले किंवा ट्रेझरी/आंतरराष्ट्रीय बँकिंग विभाग विभागात कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान 50 टक्के गुणांसह असावा आणि मॅट्रिकची परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण असावा.

  • प्रति मिनिट मराठी टायपिंगमध्ये ३० श.प्र.मि. आणि प्रति मिनिट इंग्रजी टायपिंगमध्ये ४० श.प्र.मि.. 
    संगणक अनुप्रयोगांमध्ये (वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेडशीट) प्रवीणता असणे आवश्यक

  • मराठी विषयासह 10 उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याच्याकडे वैध एलएमव्ही परवाना असावा.

  • मराठी विषयासह 10 उत्तीर्ण केलेली असावी. इलेक्ट्रिशियन / प्लंबिंग कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.


वयोमर्यादा किती?


अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जून 2025 रोजी 18 ते 32 वर्षे असणे गरजेचं आहे. 


परीक्षा फी किती?


ज्युनिअर श्रेणी अधिकारी - 1770 रुपये आणि इतर पदांसाठी 1180 रुपये


किती पगार?


ज्युनिअर श्रेणी अधिकारी - प्रशिक्षण कालावधीत 30,000 रुपये, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 52 हजार 100 रुपये पगार मिळणार. 


असोसिएट -प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा 25000 रुपयांचा स्टायपेंड दिला जाईल. प्रशिक्षणानंतर 34,400 रुपये पगार दिला जाणार आहे. 


टंकलेखक - प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा 25000 रुपये स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणानंतर 34,400 रुपये


वाहनचालक - प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 25000 स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणानंतर 34,400


शिपाई - प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 20000 स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणानंतर 24,500


नोकरी ठिकाण - मुंबई


अर्ज पद्धती - ऑनलाइन


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 ऑगस्ट 2025


अधिकृत संकेतस्थळ - https://www.mscbank.com/


महत्वाच्या बातम्या:


Bank Jobs : बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसर पदावर भरती, 2500 जागा भरणार, महाराष्ट्रात मराठी भाषिकांसाठी 485 जागा