महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे तब्बल 18882 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यापैकी 5639 पदे ही अंगणवाडी सेविका पदासाठी आहेत. तर 13 हजार 243 पदे ही अंगणवाडी मदतनीस पदासाठी असतील. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास कोणती कागदपत्रे लागतात? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे ही कागदपत्रे नेमकी कोणती आहेत? ते जाणून घेऊ या... 


स्थानिक पातळीवर जाहिराती निघाल्या


राज्यभरातील अंगणवाड्यांमध्ये आता मतदणीस आणि अंगणवाडी सेविका पदासाठी भरती प्रक्रिया चालू झाली आहे. वेगवेगळ्या जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर तशा प्रकारच्या जाहिरातीही काढण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज करायचा असल्यास कोणकोणती कागदपत्रे लागतात? असे विचारले जात आहे. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 


अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागणार? 


अर्जासोबत जोडावयाची प्रमाणपत्र (सांक्षाकित सत्य प्रती)


1. तहसिल कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
2. लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र
3. सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
4. सक्षम प्राधिकारी यांचे विधवाचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
5. शासकिय / अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराचे बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
6. शैक्षणीक अर्हता / पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रके अर्जा सोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित (Self Attested) केलेली जोडणे बंधनकारक राहील.
7. अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना किमान आर्हता 12 वी (HSC) उत्तीर्ण आवश्यक आहे उमेदवार पदवी/पदव्युत्तर इत्यादी बाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्य प्रति जोडणे
8. डी.एड. पदविका, बी.एड. पदविका असल्यास त्याचे गूणपत्रक व प्रमाणपत्रक.
9. विधवा व अनाथ सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
10. उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र जोडणे.
11. अंगणवाडी सेविका/अंणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणुन कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. (लागु असल्यास) 
12. आधार कार्ड


हेही वाचा :


सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेमध्ये हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज?


मोठी बातमी : महिला बालविकास विभागाचा धमाका, तब्बल 18 हजार 882 पदं भरणार, अंगणवाडी सेविका, मदतनीसांचाही समावेश!


Layoff: भारतातील 'या' दिग्गज कंपनीनं उचललं मोठं पाऊल, 700 कर्मचाऱ्यांना झटक्यात दिला नारळ