बंगळुरू: आयपीएलच्या नवव्या मोसमात ख्रिस गेलला अजूनही सूर गवसलेला नसला, तरीही विंडीजच्या धडाकेबाज सलामीवीराचा फॉर्म ही आपल्या दृष्टीनं चिंतेची बाब नसल्याचं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीनं म्हटलं आहे.
बंगलोरच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये मिळून गेलला केवळ एक धाव करता आली आहे. पहिल्या सामन्यात त्यानं एक धाव केली होती, तर दुसऱ्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही.
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या अखेरच्या तीन सामन्यांमध्येही गेलला दोन अंकी धावसंख्या उभारता आली नव्हती. तरीही बंगलोरचा कर्णधार विराट कोहली म्हणतोय की, गेलचा खराब फॉर्म त्याच्यासाठी चिंतेची बाब नाही. एका मोठ्या खेळीपासून तो केवळ एक सामना दूर असल्याचा विश्वासही विराटनं व्यक्त केला.
ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात गेलच्या नावावर 17 शतकं आहेत, याची आठवण करून देत विराट कोहली म्हणाला की, ट्वेन्टी ट्वेन्टी एकाच फलंदाजानं 17 शतकं ठोकणं हा काही विनोद नाही.
IPL : गेलच्या फॉर्मबाबत कर्णधार कोहली म्हणतो...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Apr 2016 05:33 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -