सुरेश रैनाच्या घरी नन्ही परी, नाव ठेवलं...
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2016 08:17 AM (IST)
मुंबई : टीम इंडियाचा क्रिकेटर सुरेश रैनाच्या घरी छोट्या पाहुणीचं आगमन झाल्याची आणि पत्नी प्रियांकाने मुलीला जन्म दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.. मात्र रैनाने यासंदर्भात काहीही सांगितलं नाही. सुरेशाने रैनाने मुलीचं नाव श्रेयांशी ठेवलं आहे. रैना बाबा बनल्याचं समजताच सोशल मीडियावर चाहत्यांना त्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. सुरेश आणि प्रियांका दोघेही हॉलंडमध्ये आहेत. सुरेश रैनाने कालच प्रेग्नंट पत्नीसह फोटो शेअर केले होते.