मुंबई : बीसीसीआयने आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयपीएल 2017 मधील पहिला सामना 5 एप्रिल रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. तर लीगचा अंतिम सामना याच स्टेडियममध्ये 21 मे रोजी होईल.
परंतु आयपीएलमध्ये सामील होणारे अनेक परदेशी क्रिकेटपटू संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. हे खेळाडू ही स्पर्धा मध्येच सोडून जाऊ शकतात.
या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, इंग्लंडचा जॉस बटलर या खेळाडूंचा समावेश आहे. खेळाडूंनीही याबाबत आपापल्या संघांना माहिती दिली आहे.
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक
दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू 7 मे नंतर स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. तर इंग्लंडचे खेळाडू 1 मे आणि 14 मे नंतर आयपीएलमध्ये खेळणार नाहीत. हे सर्व खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय संघात खेळण्यासाठी मायदेशी परतणार आहेत.
हे खेळाडू आयपीएल मध्येच सोडू शकतात -
एबी डिव्हिलिअर्स - दक्षिण आफ्रिका (रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर)
फाफ डू प्लेसिस - दक्षिण आफ्रिका (रायझिंग पुणे सुपरजायंट्स)
जेपी ड्युमिनी - दक्षिण आफ्रिका (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
क्विंटन डी कॉक - दक्षिण आफ्रिका (दिल्ली डेयरडेविल्स)
ख्रिस मॉरिस - दक्षिण आफ्रिका (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
जॉस बटलर - इंग्लंड (मुंबई इंडियन्स)
सॅम बिलिंग्स - इंग्लंड (दिल्ली डेयरडेविल्स)
डिव्हिलियर्ससह अनेक क्रिकेटपटू IPL मध्येच सोडणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Feb 2017 01:55 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -