मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कॅरेबियन सुपरस्टार ख्रिस गेलवर बीसीसीआय कारवाई करण्याची शक्यता आहे. ब्रिटिश वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गेलनं आक्षेपार्ह वक्तव्यं केली होती. गेलनं त्यावेळी काही प्रश्नांची उत्तरं देताना महिलांविषयी खालच्या पातळीवर टिपण्णी केली होती.

हे प्रकरण आता आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी गांभीर्यानं घेतलं असून, त्याविषयी रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरच्या व्यवस्थापकांसोबत चर्चा केल्याचं वृत्त आहे.

शुक्ला याविषयी बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांच्याशी आयपीएल संपल्यावर चर्चा करणार असून, त्यानंतर गेलवर कारवाई केली जाऊ शकते.

माझ्याकडे जगातली सर्वात मोठी बॅट, गेलचा महिला पत्रकाराशी रंगेलपणा

जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगदरम्यान एका महिला प्रेझेंटरशी सलगी केल्याप्रकरणी गेलला दंड ठोठावण्यात आला होता.

मेलबर्न रेनेगेड्स या गेलच्या टीमनं बिग बॅश लीगच्या पुढच्या मोसमात त्याला खेळवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. इंग्लंडच्या सॉमरसेट कौंटी टीमनंही गेलवर कारवाई केली. त्यानंतही गेलचा रंगेलपणा कमी झालेला दिसत नाही.

संबंधित बातम्या

गेलच्या फ्लर्टिंगचा व्हिडिओ

माझ्याकडे जगातली सर्वात मोठी बॅट, गेलचा महिला पत्रकाराशी रंगेलपणा

दिल्लीविरुद्धची मॅच जिंकल्यानंतर विराटने कोणाला कॉल केला?

VIDEO: ख्रिस गेल आणि कोहलीचा 'सैराट' डान्स

सलमानच्या हिरोईनसोबत ख्रिस गेलची पार्टी!

ख्रिस गेलला दंड, महिला पत्रकारासोबत फ्लर्टिंग महागात

तो निव्वळ विनोद होता, फ्लर्टिंग वादानंतर गेलचा माफीनामा

महिला रिपोर्टरवर कमेंट करणाऱ्या ख्रिस गेलवर जोरदार टीका