कोलकाता : ख्रिस गेल, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरच्या तोफा आज एकत्र धडाडल्या. या तिघांच्या फटकेबाजीच्या जोरावर बंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखलं.
बंगलोरचा हा बारा सामन्यांमधला हा सहावा विजय असून कोलकाताचा हा बारा सामन्यांमधला पाचवा पराभव ठरला आहे.
ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात कोलकाताने बंगलोरला विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना ख्रिस गेल आणि विराट कोहलीने 71 धावांची सलामी दिली. मग विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने दुसऱ्या विकेटसाठी 115 धावांची अभेद्य भागीदारी रचून बंगलोरला विजय मिळवून दिला.
गेलने 31 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 49 धावांची खेळी केली. कोहलीने 51 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद 75 धावांची खेळी उभारली. तर डिव्हिलियर्सने 31 चेंडूंतली नाबाद 59 धावांची खेळी पाच चौकार आणि तीन षटकारांनी सजवली.
त्याआधी गौतम गंभीर आणि मनिष पांडेच्या अर्धशतकांच्या जोरावर कोलकाताने 20 षटकांत पाच बाद 183 धावांची मजल मारली होती.
कोहली, एबी आणि गेलचा धुमधडाका, कोलकाताचा धुव्वा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 May 2016 03:52 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -