मुंबई : आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. आपल्या संघाची अवस्था पाहून मालकीण प्रिती झिंटाची अस्वस्थता समोर आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळवलेल्या सामन्यात पंजाबचा निसटता पराभव झाला होता. याचं दुःख प्रिती झिंटाला पचवता आलं नाही. त्यामुळे तिने चक्क संघाचे प्रशिक्षक संजय बांगर यांनाच शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर बांगर यांना संघातून बाहेर करण्याची धमकी दिल्याचंही कळतं.
मुंबई मिरर या वृत्तपत्राने घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
काय होता वाद?
पंजाबच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये होणारा बदल प्रितीला पंसत नव्हता. त्यामुळे सर्व स्टाफसमोरच बांगर आणि प्रिती यांच्यात शाब्दिक वाद झाला होता.
मोहालीत सोमवारी बंगलोरविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलच्या अगोदर फरहानला फलंदाजीला पाठवल्यामुळे प्रिती नाराज होती. त्यामुळे पराभवासाठी प्रितीने बांगरला कारणीभूत ठरवलं, अशी माहिती मुंबई मिरर या वृत्तपत्राशी बोलताना उपस्थितांनी दिली.
प्रितीने काहीही ऐकून न घेता बांगरवर भडकली. एवढंच नाही तर बांगरला शिवीगाळही केली होती, असं तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं.
आयपीएलमध्ये पंजाबचा संघ तळाला
पंजाब संघ या आयपीएल हंगामात तळाला आहे. पंजाबने आतापर्यंत 10 सामने खेळले असून त्यापैकी केवळ तीन सामन्यांतच विजय मिळवता आला आहे.
संजय बांगर सध्या पंजाब संघाचा मुख्य प्रशिक्षक आहेत. बांगरने भारतीय संघाकडून 12 कसोटी आणि 15 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. बांगर भारतीय संघाचा प्रशिक्षकही होता.
दरम्यान प्रिती आणि बांगर यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रिती आणि बांगर या दोघांनीही घटनेनंतर स्पष्टीकरण दिलं असलं तरी व्यवस्थापनामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे प्रितीवर टीका होत आहे.
टीम-स्टाफसमोरच प्रितीची संजय बांगरला शिवीगाळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 May 2016 07:44 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -