मुंबई : आयपीएलच्या नवव्या मोसमात क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंचा आवाज क्रिकेटप्रेमींना ऐकता येणार नाही. कारण बीसीसीआयने हर्षा भोगले यांच्यासोबतचा करार रद्द केला आहे.
यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या ऑक्शन आणि काही प्रमोशनल व्हीडीओजमध्ये भोगले यांना स्थान देण्यात आलं होतं. आयपीएलमध्ये समालोचनाचे अधिकार हे सोनी नेटवर्क कंपनीकडे आहेत, मात्र या स्पर्धेचं आयोजन बीसीसीआय करत असल्यामुळे समालोचकांच्या अंतिम यादीचा निर्णय बीसीसीआयचं घेतं.
हर्षा भोगलेंचं कंत्राट अचानक रद्द केल्याचं कारण अजुन समजू शकलं नसलं तरीही बीसीसीआयमधील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार टी-20 विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात भोगले यांचे विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशी खटके उडाले होते. त्यानंतरचं भोगलेंचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे.
क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंना बीसीसीआयकडून बाहेरचा रस्ता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Apr 2016 08:00 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -