बंगळुरु : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आणि युवराज सिंहच्या शिरपेचात मानाचा एक नवा तुरा खोवला गेला. तीन विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसह आयपीएल विजेत्या संघात समावेश असलेल्या युवराज हा पहिलाच वीर ठरला आहे.

 

 

युवराज सिंहचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 2000 साली 19 वर्षांखालील वयोगटाचा विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकात युवीने मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला होता.

 

 

2002 साली भारताने श्रीलंकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीचं संयुक्त विजेतेपद मिळवलं होतं. भारताच्या त्या संघात युवराजचा समावेश होता.

 

 

त्यानंतर 2007 साली युवराजचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ट्वेन्टी-20 च्या पहिल्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या विश्वचषकात युवीने सहा चेंडूंत सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता.

 

 

मग युवराजने 2011 साली अष्टपैलू कामगिरी बजावून भारताला वन डेचा विश्वचषक जिंकून दिला होता. आता आयपीएलच्या नवव्या मोसमात सनरायझर्स हैदराबादला विजेतेपदाची ट्रॉफी मिळवून देण्यात युवराजने महत्त्वाची भूमिका बजावली.