हाशिम अमला आयपीएलमध्ये या संघाकडून खेळणार
एबीपी माझा वेब टीम | 04 May 2016 06:29 AM (IST)
मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज हाशिम अमला आयपीएलमध्ये पर्दापण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या मोसमात मुरली विजयच्या किंग्स इलेव्हन पंजाबकडून आपल्याला हशिम अमला खेळताना दिसणार आहे. पंजाबचा धडाकेबाज फलंदाज शॉन मार्शने दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांमधून माघार घेतली आहे. त्यामुळे शॉन मार्शच्या जागी हशिम अमलाला पंजाबच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. किंग्स इलेव्हन पंजाबला गेल्या नऊ सामन्यांपैकी केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत.