Asian Games 2018 : भारताच्या झोळीत आज पाच पदकं
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2018 11:50 PM (IST)
1
सायनाने महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. 1982 नंतर बॅडमिंटनच्या एकेरी प्रकारात भारताला मिळालेलं हे पहिलं पदक आहे. (फोटो- एपी)
2
महिलांच्या ३००० मीटर्स स्टीपलचेस प्रकारात भारताला रौप्यपदकांची कमाई करून दिली आहे. (फोटो- एपी)
3
पदक स्वीकारल्यानंतर सुधासिंगच्या चेहऱ्यावर रौप्य पदक जिंकल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. (फोटो- एपी)
4
बॅडमिंटनच्या महिला एकेरीमध्ये पी व्ही सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. 1962 नंतर अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. (फोटो- एपी)
5
नीना वरकिलनं लांब उडीमध्ये रौप्य पदक जिंकलं. (फोटो- एपी)
6
जकार्ता एशियाडमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने आज सूवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. (फोटो- एपी)
7
नीरज चोप्राने 88.06 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकलं. (फोटो- एपी)