Zee 5 Marathi: भारतभर प्रादेशिक कंटेंट पाहण्याच्या सवयींवर वाढता प्रभाव टाकत असताना मराठी Zee 5 सातत्याने मराठी ओरिजिनल्स, चित्रपट आणि विविध फॉरमॅट्सची प्रोजेक्ट घेऊन येत आहेत. वर्षभराची कंटेंट स्लेट सादर करून त्यानी नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. मराठी कथाकथनाची खोली, वैविध्य आणि सांस्कृतिक समृद्धी यावर आधारित अनेक नवनवीन कथा यातून बघायला मिळणार असल्याचं कळतंय. प्रेक्षकांची दाद, वाढता व्ह्यूअरशिप आणि यशस्वी ओरिजिनल्स यांनी गाजलेल्या ऐतिहासिक वर्षानंतर मराठी Zee 5 ने आज आपल्या दुसऱ्या वर्षासाठी महत्त्वाकांक्षी आणि वैविध्यपूर्ण कंटेंट स्लेटचे अनावरण केले. ज्यातून वर्षभर प्रेक्षकांपर्यंत प्रीमियम मराठी कथा पोहोचवण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.

Continues below advertisement

मराठी Zee 5 घेऊन येणार दमदार आणि वैविध्यपूर्ण नव्या कंटेंट !

मराठी Zee 5 च्या धाडसी आणि वैविध्यपूर्ण नव्या स्लेटमध्ये लोकप्रिय फ्रँचायझी, नव्या ओरिजिनल सिरीज, डायरेक्ट-टू-डिजिटल चित्रपट, यशस्वी पोस्ट-थिएट्रिकल प्रीमियर्स आणि लाइव्ह स्पोर्ट्स यांचा समावेश आहे. ज्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन ठरणार आहे. आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसेससोबतच्या सहकार्यांद्वारे आणि मराठी सिनेमातील काही सर्वाधिक गाजलेल्या निर्माते व सर्जकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत, ही स्लेट कथा, प्रतिभा आणि नावीन्य यांमध्ये प्लॅटफॉर्मची सातत्यपूर्ण गुंतवणूक दर्शवते.

Continues below advertisement

लोकप्रिय कलाकारांची एन्ट्री

सिरीज स्लेटमधील आगामी शीर्षकांमध्ये मराठी Zee 5 च्या सर्वाधिक यशस्वी आणि लोकप्रिय दोन फ्रँचायझींच्या घोषणा केल्या आहेत. बहावा एंटरटेनमेंट एंटरटेनमनेची हे काय नवीन? दुसऱ्या सीझनसह परतत असून उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर Cinemasters Production ची देवखेळ 2 लोकप्रिय अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या जोडीला पुन्हा घेऊन येत आहे. भरत जाधव , शर्वरी जेमनीस , पुष्कर श्रोत्री आणि शिवानी रांगोळे यांच्या भूमिका असलेल्या कोण यशवंत पानसरे? तसेच Coquelicot Pictures ची 112 ज्याची निर्मिती निखिल महाजन यांनी केली असून जीजीवीषा काळे आणि रोहीत सातपुते यांनी दिग्दर्शन केले आहे. अशा वैविध्यपूर्ण नव्या ओरिजिनल्सच्या मालिकेमुळे ही स्लेट अधिक उत्कंटवर्धक झाली आहे. ज्यातून नव्या कलाकारांची एंट्री नव्या प्रभावी कथा आणि जॉनर-आधारित कथाकथनामध्येप्लॅटफॉर्मची सातत्यपूर्ण गुंतवणूक दिसून येते.

थ्रिलर ओरिजनलचा धडाका

उत्तम सिरीज लाइनअपला पूरक अशी तितकीच महत्त्वाकांक्षी फिल्म स्लेट देखील यात असून विविध जॉनर आणि फॉरमॅट्समध्ये नवनवीन चित्रपट यात दिसणार आहेत. पोस्ट-थिएट्रिकल प्रीमियर्समध्ये Zee Studios च्या तुंबाडची मंजुळा , भूतमभयम (Bhootam Bhayam ) यांचाही समावेश आहे. मंगेश पवार कंपनीचा ओरिजिनल चित्रपट “अडकित्ता” देखील यातून अनुभवायला मिळणार आहे. यात सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे तर येणाऱ्या गोष्टींची केवळ एक झलक आहे पण या वर्षात आणखी अनेक ब्लॉकबस्टर सप्राईज प्रेक्षकांची वाट पाहत आहेत.

स्टँडअप शो ते हॉरर ड्रामा

प्लॅटफॉर्मच्या मनोरंजनाच्या व्याप्तीचा विस्तार करत “हसावी हसवी द मराठी स्टँडप” शो हा अनिश गोरेगांवकर प्रोडक्शनचा खास शो देखील झी ५ मराठीवर बघायला मिळणार असून ज्यात अनिश गोरेगांवकर, फातिमा आयेशा , साहिल होराने आणि साहिल शेख सहभागी आहेत. स्क्रिप्टेड मनोरंजनाच्या पलीकडे जात मराठी Zee 5 प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या गरजा पूर्ण करणाऱ्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण कंटेंट परिसंस्थेद्वारे आपली व्हॅल्यू प्रपोजिशन अधिक मजबूत करत आहे.

एकत्रितपणे ही सर्व शीर्षके मराठी Zee 5 चे वैविध्यपूर्ण आणि सर्वांगीण कंटेंट अनुभव देण्याचे व्हिजन प्रतिबिंबित करतात. ज्यामध्ये राज्यभरातील प्रेक्षकांसाठी प्रमुख प्रतिभा, समकालीन कथाकथन आणि कॉमेडी, ड्रामा, हॉरर तसेच कौटुंबिक मनोरंजनाचा समृद्ध मिलाफ आहे.

आपल्या भूमीतून आलेल्या कथांना प्रोत्साहन

Marathi Zee 5 च्या बिझिनेस हेड VR हेमा म्हणाल्या “जेव्हा आम्ही मराठी Zee 5 लॉन्च केले तेव्हा आमचा विश्वास साधा पण धाडसी होता की मराठी प्रेक्षक अशा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे हक्कदार आहेत जो खास त्यांच्यासाठी समर्पित असेल. अधूनमधून उपलब्ध होणारे प्रादेशिक ऑफरिंग नव्हे आज, आम्हाला एका वचनबद्ध आणि नाविन्यपूर्ण OTT प्लॅटफॉर्मचा अभिमान आहे, जो सातत्याने ओरिजिनल मराठी कथांमध्ये गुंतवणूक करत आहे आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाने या व्हिजनला मान्यता दिली आहे. ही धाडसी आणि वैविध्यपूर्ण नवी स्लेट मराठी माणसाच्या जिद्द, निर्धार, धैर्य आणि उत्कटतेचे प्रतिबिंब आहे.

प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारलेल्या आपल्या आवडत्या जुन्या फ्रँचायझींसोबतच, आम्ही नवे ओरिजिनल्स, चित्रपट आणि नवे फॉरमॅट्स सादर करत आहोत, जे स्ट्रीमिंगवरील मराठी मनोरंजनाच्या सीमा सातत्याने पुढे नेत आहेत. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, हे मराठी इंडस्ट्रीतील अविश्वसनीय सर्जनशील प्रतिभेचे आणि आपल्या भूमीतून आलेल्या कथांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. ओरिजिनल सिरीज आणि चित्रपटांपासून पोस्ट-थिएट्रिकल्स, AI आणि कॉमेडीपासून लाइव्ह स्पोर्ट्सपर्यंत, मराठी Zee 5 मराठी प्रेक्षकांसाठी सर्वाधिक सर्वसमावेशक डेस्टिनेशन म्हणून आपले वेगळेपण कायम राखत आहे.