Zarine Khan Instagram post about mothers health: बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान सध्या कठीण काळातून जात आहे. तिच्या आईच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. जरीन खानच्या आईची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. बिघडलेल्या तब्येतीमुळे जरीन खानच्या आईला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कठीण काळात ती खूप दु:खी आहे. तिनं या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. आईच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी तिनं चाहत्यांना प्रार्थना करण्याची मागणी केली आहे. सध्या जरीन खानचे चाहते चिंतेत पडले आहेत.
अभिनेत्री जरीन खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं चाहत्यांना एक मागणी केली आहे. तिनं पोस्टद्वारे चाहत्यांना आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीनं लिहिलं की, 'आईला पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कृपया तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करा'. जरीन खानच्या आईला नेमकं झालं तरी काय? त्यांना कोणत्या आजाराने ग्रासले आहे? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
काही काळांपूर्वी म्हणजेच, ऑक्टोबर 2025 रोजी जरीन खानच्या आईची अचानक तब्येत बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी जरीन खानने आपल्या आईच्या तब्येतीविषयी माहिती दिली. तसेच चाहत्यांना आईच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. 2025 साली तिच्या आईची तब्येत एका आठवड्यात बरी झाली होती. अभिनेत्रीनं एका आठवड्यात तिच्या आईला घरी आणले होते. तिनं याची माहिती सोशल मीडियात शेअर केली होती. दरम्यान, जरीन खानच्या आईची पुन्हा एकदा तब्येत बिघडली आहे.
जरीन खानला खरी ओळख 2010 साली प्रदर्शित झालेल्या 'वीर' या चित्रपटातून मिळाली होती. 'वीर' या चित्रपटात अभिनेत्री जरीन खान सलमान खानसोबत दिसली होती. त्यानंतर तिनं हाऊसफूल 2, हेट स्टोरी 3, अक्सर 2 आणि 1929 या चित्रपटात झळकली होती. जरीनने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये नशीब आजमावल्यानंतर अभिनेत्री पंजाबी चित्रपटांकडे वळली.
