Zareen Khan On Aksar 2: बॉलिवूड अभिनेत्री झरिन खान (Actress Zareen Khan) गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण एक काळ असा होता की, झरिनचे एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे रुपेरी पडद्यावर झळकत होते. झरिनने 2010 मध्ये सलमान खानच्या (Salman Khan) 'वीर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood News) पदार्पण केलेलं. पण, झरिनला खरी ओळख मिळाली 'हेट स्टोरी 3' (Hate Story 3) मधून, ज्यामध्ये तिच्या इंटिमेट सीन्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं. त्यानंतर झरिन 'अक्सर 2' मध्ये झळकलेली. पण, सिनेमा रिलीज होऊन कित्येक दिवस उलटल्यानंतर आता अभिनेत्रीनं याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 'अक्सर 2'मध्ये झरिन इंटिमेट आणि किसिंग सीन्ससाठी फसवलं गेलं होतं.
हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत झरिन खाननं सांगितलेलं की, 'हेट स्टोरी 3' नंतर तिला अशाच प्रकारच्या भूमिका मिळत होत्या. पण तिला टाईपकास्ट व्हायचं नव्हतं, म्हणून 'अक्सर 2' मध्ये होकार देण्यापूर्वी तिनं दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्याकडून कबूल करुन घेतलेलं की, चित्रपटातील तिची भूमिका इंटिमेट असणार नाही. पण, प्रत्यक्षात मात्र ज्यावेळी सिनेमाचं शुटिंग सुरू झालं, त्यावेळी दिग्दर्शकांनी तिला प्रत्येक सीनमध्ये किस करायला लावलं.
टाईपकास्ट व्हायचं नव्हतं, म्हणून... : झरिन खान
आता 'अक्सर 2' रिलीज झाल्यानंतर कित्येक वर्षांनी चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी फसवणूक केल्याचा आरोप अभिनेत्री झरिन खाननं केलाय. अभिनेत्री म्हणाली की, "जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट करता, तेव्हा कसा तरी ते दोन-तीन चित्रपट किंवा भविष्यात जे काही असेल, तुम्हाला अशा प्रकारच्या ऑफर येऊ लागतात. टाईपकास्ट... जे मला नको होतं. बरं, मी खूप धाडसानं 'हेट स्टोरी' केलेला. जेव्हा 'अक्सर 2' करण्याचं ठरलं आणि मी त्याच्या नरेशनसाठी गेलेले, तेव्हा दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी मला चित्रपटाची कथा सांगितली.'
दिग्दर्शकानं खोटं बोलून मला कास्ट केलेलं : झरिन खान
झरिन खान पुढे बोलताना म्हणाली की, "पहिला 'अक्सर' चित्रपट आला, त्यात इमरान हाश्मी होतो, चित्रपट खूप चांगला होता. म्हणून मी या हिट फ्रँचायझीचा भाग असल्याचा मला खूप आनंद झाला. त्यांनी (दिग्दर्शकानं) मला सर्वकाही समजावून सांगितलं आणि मी माझ्या आयुष्यात त्यांची एक ओळ कधीही विसरणार नाही. कारण मी त्यांना सांगितलं होतं की, त्यात कोणतेही बोल्ड सीन्स नाहीत. म्हणून मी त्यांना नाही म्हटलं, नाही, ते मला म्हणाले आम्ही हेट स्टोरी बनवत नाही. मी त्यांना म्हटलं की, अरे वाह मग चांगलंच आहे आणि त्यांना माझा होकार कळवला.
"शुटिंग सुरू झाल्यानंतर, प्रत्येक दुसऱ्या सीनला मला किस करायला सांगायचे..."
अभिनेत्री झरिन खान म्हणाली की, "जेव्हा शुटिंग सुरू झालं, तेव्हा प्रत्येक दुसऱ्या सीनमध्ये किस करायला सांगितलं जात होतं, मला ते खूप विचित्र वाटलं. मी असं म्हणत नाही की, मी खूप सती सावित्री किंवा पाकीजा आहे आणि मी हे करणारही नाही. मी आधीच एक चित्रपट केला आहे, पण ज्या लोकांनी तो चित्रपट बनवला होता, त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी मला खूप नम्रपणे सांगितलं होतं की, हे होईल आणि असं होईल. पण, या शुटिंगवेळी त्यांनी सर्वात आधी मला सांगितलं की, आम्ही असं काहीच करणार नाहीय आणि मग जेव्हाही मी सेटवर जायचे, त्यावेळी एक सरप्राईज सीन असायचा. म्हणून प्रतिक्रिया देणे माझे कर्तव्य होते आणि मी प्रतिक्रिया दिली..."
"मला माझ्याच फिल्मच्या प्रिमियरला बोलावलं नाही..."
झरिन खान पुढे बोलताना म्हणाली की, "ते एक मोठे प्रोडक्शन हाऊस होतं आणि मी दिग्दर्शकाला गुडघे टेकायला लावले. कारण त्यानं मला सांगितलं होतं की, आम्ही हेट स्टोरी बनवत नाही. पण तो निर्मात्यांसमोर मात्र मूग गिळून गप्प होता, त्यानं मला जी कबुली दिलेली, त्याचा स्वीकार केलाच नाही. आता तो निर्मात्यांकडे जाऊन माझ्याविरुद्ध काहीतरी बोलायचा आणि दिग्दर्शक माझ्याकडे यायचा आणि म्हणायचा की, तो निर्मात्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर दबाव आणत आहे. त्यामुळे माझ्यात आणि निर्मात्यांमध्ये मतभेद झाले आणि सर्वांसमोर मी सर्वात वाईट ठरले. वाद इतका वाढला की, मला माझ्या स्वतःच्या चित्रपटाच्या प्रीमियरला बोलावलं नव्हतं...."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
