Yuzvendra Chahal gives tight hug to rumored GF RJ Mahvash  : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि अभिनेत्री आर जे महावश यांच्या कथित लव्हस्टोरीची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. दरम्यान,नुकतेच युजवेंद्र चहल आणि आर जे महावश लंडनमधील रस्त्यांवर एकत्र फिरताना पाहायला मिळाले होते. मात्र, आता युजवेंद्र चहलचा बर्थडे साजरा करतानाचा एक  व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये युजवेंद्र चहल आर जे महावशला कडकडून मिठी मारताना दिसतोय. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. 

RJ महवश आणि युझवेंद्र चहलची एकमेकांना मिठी 

व्हिडीओमध्ये असं दिसतं की चहलसाठी एक छोटेखानी वाढदिवसाची पार्टी ठेवण्यात आली होती. अनेक ओळखीची माणसं त्या पार्टीमध्ये मजा करताना दिसली, पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते RJ महवशने. तिने पांढऱ्या रंगाचा टँक टॉप आणि निळ्या रंगाची डेनिम स्कर्ट परिधान केली होती. चहल दुसरीकडे अगदी आनंदी दिसत होता. तो डान्स करत होता आणि यावेळी RJ महवशला मिठी मारताना पाहायला मिळाला. 

दरम्यान,युजवेंद्र चहल आणि आर जे महावशच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. काहींनी लिहिलं, "तुमचं मिठी मारण्याच्या पद्धतीवरून समजतं की तुम्ही किती जवळचे आहात." तर काहींनी लव्हवाले इमोजी शेअर केल्या. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटिझन्सना वाटतंय की हे दोघं फक्त मित्र नाहीत. तर दोघांमध्ये त्याहूनही काहीतरी अधिकचं नातं आहे.

RJ महवशकडून युझवेंद्र चहलसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आर जे महावशने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर युझवेंद्र चहलचा एक फोटो शेअर केला. चहल एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला दिसतो आहे. या फोटोमध्ये युजवेंद्र चहलने साधा पण आकर्षक असा शर्ट परिधान केला आहे आणि थेट कॅमेऱ्याकडे पाहतो आहे. हा फोटो काढणारी कोणी आहे हे ओळखणं अवघड नाही. बहुधा त्याची चर्चेत असलेली मैत्रीणच.

तिच्या शुभेच्छांमध्ये तिने लिहिलं,

"हॅपी बर्थडे यूझी! वय वाढणं हे आयुष्याचाच एक भाग आहे, आणि बाकी भाग तर अजूनही वाईट असतात. तर ऑल द बेस्ट!"यासोबत तिने एक हसणारी इमोजी आणि कोरियन हार्ट इमोजीही टाकली. असं वाटतं की हे चर्चेतले जोडपं लंडनमध्ये डिनर डेटवर गेलेलं होतं.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO : जेव्हा प्रमोद महाजन यांच्या लेकीने सिनेमात साकारली होती अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका