Yuvraj Singh Annalia Fraser: आपल्या मस्तमौला स्वभावासाठी ओळखला जाणारा युवराज सिंह (Yuvraj Singh) आपल्या बिनधास्त लाईफस्टाईलसाठी ओळखला जातो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, तो त्याच्या सेवाभावी संस्थेद्वारे समाजसेवा जितकी करतो, तितकाच तो त्याचं पर्सनल लाईफही एन्जॉय करताना दिसतो. सध्या युवराज सिंह त्यानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मस्तमौला युवराज सिंह काही परदेशी मॉडेल्ससोबत दिसतोय.
युवराज सिंहचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे जोरदार चर्चा सुरु होत आहेत. या फोटोंमध्ये युवीसोबत एक हॉट परदेशी मॉडेल दिसतेय.
जिनं समुद्राच्या मधोमध एका यॉटवर युवराज सिंहसोबत बोल्ड फोटोशूट केलंय. आता सध्या युवराजसोबत दिसलेली हॉट अँड ब्युटीफुल ती कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय.
भारतीय क्रिकेटचा सिक्सर किंग युवराज सिंह सध्या चर्चेत आहे. तो सोशल मीडियावर एका परदेशी महिलेसोबत दिसतोय. समुद्राच्या मध्यभागी युवराज सिंह आणि त्या अज्ञात महिलेचे फोटोशूट व्हायरल होत आहे.
या फोटोंमध्ये युवीसोबत दिसणारी अज्ञात महिला कोण आहे? इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेल्या फोटोंमध्ये युवराज सिंह कूल लूकमध्ये दिसतोय. त्याच्या अवतीभोवती खूप परदेशी मॉडेल्स दिसतायत. पण, त्यांच्यापैकी एका मॉडेलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. युवराज सिंहसोबत दिसलेली ती कोण? हा प्रश्न सर्वांना पडलाय.
युवराज सिंहसोबत दिसलेली महिला मॉडेल कॅनडाची एक टेनिस प्लेयर अॅनेलिया फ्रेजर आहे. कॅनडाची टेनिस प्लेयर असलेल्या अॅनेलिया फ्रेजरनं युवराज सिंहसोबत फोटोशूट का केलंय? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
अॅनेलिया फ्रेजरनं आपल्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःला मॉडल, अभिनेता आणि टेनिस प्लेयर सांगितलं आहे.
अॅनेलिया फ्रेजरनं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर हॉट मॉडलिंग फोटोज शेयर केले आहेत. इंस्टाग्रामवर तिचे 45 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
युवराज सिंहसोबत अॅनेलिया फ्रेजरनं एक अॅड कॅम्पेन केलंय, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फाइनो टॅकिला नावाची एक कंपनी आहे, जिचा युवराज सिंह ब्रँड अॅम्बेसिडर आहे.
युवराज सिंहच्या या फोटोंवर त्याचा मित्र आणि टीम इंडियाचा दिग्गज स्पिनर हरभजन सिंहनं कमेंट केली आहे. हरभजननं म्हटलंय की, 'पाजी, घरी जायचंय की, नाही... एवढ्या महिला एकत्र केल्यात... चांगला माणूस बना... '
महत्त्वाच्या इतर बातम्या :