Youtube New AI Song Features : आगामी काळात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याची चुणूकच आता दिसत आहे. एआयचा वापर आता प्रत्येक क्षेत्रात होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे जगभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एआयच्या मदतीने आता युट्युबवर तुम्हाला स्वत: ला गाणी तयार करता येणार आहे. सध्या युट्यूब काही मोठ्या म्युझिक कंपन्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
'फायनान्शिअल टाईम्स'ने वृत्तानुसार, युट्यूब आपल्या युजर्सना या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत आपल्या कलाकारांचे संगीत वापरण्याची परवानगी देऊ इच्छित आहे. यासाठी त्यांनी सोनी म्युझिक, युनिव्हर्सल म्युझिक आणि वॉर्नर रेकॉर्ड्स सारख्या बड्या कंपन्यांशी संपर्क साधला आहे. या संदर्भात युट्यूब या कंपन्यांशी चर्चा करत असून कॉपीराइटच्या मुद्यावरही चर्चा सुरू असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
'ड्रि्म ट्रॅक'ला पुढे नेण्याचा प्रयत्न
युट्युबने वर्ष 2023 मध्ये ड्रिम ट्रॅक नावाने एक फीचर टेस्ट केले होते. या चाचणी यशस्वी ठरली होती. त्यानंतर आता समोर आलेल्या वृत्तानुसार, युट्युब हे फीचर या वर्षी लाँच करणार आहे. त्यावेळी युट्युबने हे फीचर सगळ्यांसाठी लाँच केले नव्हते. आता, या नव्या फीचरनुसार कोणताही युजर सहजपणे एआयच्या मदतीने गाणं बनवू शकतो. या फीचरमुळे युट्युबवर युजर्स आपल्या आवडीचे गाणं तयार करू शकतो.
संगीतकारांना सतावतेय चिंता
संगीतजगतात एआयबाबत सध्या चिंतेचे वातावरण आहे. एआय मदतशीर असले तरी त्याचा धोकाही असल्याचे मत याआधीच संगीत जगताशी संबंधितांनी व्यक्त केले आहे. एआयमुळे आपल्याला फटका बसण्याची भीती गायक आणि संगीतकारांनी व्यक्त केली आहे. कलाकारांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी एआयच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी सुरुवातीच्या काळात करण्यात आली होती.