Shalva Kinjawadekar : 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Me Nandayla) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता शाल्व किंजवडेकर (Shalva Kinjawadekar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मालिकेतील ओमला खऱ्या आयुष्यातील स्वीटू भेटली आहे. 


शाल्व त्याची खास मैत्रीण श्रेया दफलापुरकरसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या शाल्व आणि श्रेयाचे मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनी मेहंदी सोहळ्यात धमाल डान्सदेखील केला आहे. आता चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


शाल्व आणि श्रेयाचा विवाहसोहळा 'या' दिवशी पार पडणार


मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि त्याची पत्नी तसेच लोकप्रिय अभिनेत्री मिताली मयेकरने (Mitali Mayekar) या मेहंदी कार्यक्रमात हजेरी लावली होती. येत्या 12 फेब्रुवारीला शाल्व आणि श्रेयाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. 






शाल्व आणि श्रेया गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. रिलेशनला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत त्यांचं नातं जगजाहीर केलं. नातं जगजाहीर केल्यानंतर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात. श्रेया ही व्यवसायाने फॅनन डिझायनर आहे. 


अनेक कपड्यांच्या साड्यांच्या ब्रॅण्डसाठी श्रेयाने मॉडेलिंग केलं आहे. शाल्वच्या घरच्यांनी श्रेयाला सून म्हणून अगोदरच पसंती दर्शवली होती. त्यामुळे आता त्यांची लगीनघाई करण्याचा घाट दोन्ही कुटुंबीयांनी घातलेला आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यामातून शाल्वला शुभेच्छा देत आहेत.


शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता


बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजनसृष्टीदेखील लगीनघाई सुरू आहे. केएल राहुल आथिया शेट्टीनंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी लग्नबंधनात अडकले आहेत. आता शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. व्हायरल होणाऱ्या मेहंदीच्या फोटोत शाल्व आणि श्रेया दोघेही आनंदी दिसत आहेत. रिलेशनला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 11 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!