yeh rishta kya kehlata hai actress lataa saberwal : टीव्ही अभिनेत्री लता सभरवाल या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षराची आई म्हणून ओळखली जाते. आता तिने तिच्या  चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली आहे. लता सभरवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की त्या आपल्या पती संजीव सेठपासून वेगळ्या झाल्या आहेत. या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लता आणि संजीव गेल्या 15 वर्षांपासून एकत्र होते. आता मात्र दोघांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केलीये. 

लता सभरवाल यांनी शनिवारी  इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिलं, ‘‘खूप दिवसांच्या शांततेनंतर मी (लता सभरवाल) जाहीर करत आहे की मी माझ्या पती (संजीव सेठ) यांच्यापासून विभक्त झाले आहे. त्यांनी मला एक सुंदर मुलगा दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देते.’’

लता सभरवाल यांची चाहत्यांना खास विनंती

याशिवाय लता सभरवाल यांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या शांततेचा सन्मान करावा, अशी विनंती केली. त्या म्हणाल्या, ‘‘मी सर्वांशी विनंती करते की कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या शांततेचा आदर करा आणि या वेगळेपणाबद्दल कोणतेही प्रश्न विचारू नका किंवा कॉल करू नका. धन्यवाद.’’

2021 मध्ये टेलिव्हिजन इंडस्ट्रीला केला रामराम 

लता सभरवाल आणि संजीव सेठ हे सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. ते नेहमीच त्यांच्या फॉलोअर्ससाठी व्लॉग्स आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करत असत. या जोडप्याने ‘नच बलिए 6’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये 2013 मध्ये भाग घेऊन त्यांच्या वैयक्तिक नात्याची केमिस्ट्रीही दाखवली होती. 2021 मध्ये लता सभरवाल यांनी जाहीर केलं होतं की त्या टीव्ही इंडस्ट्रीमधून निवृत्त होत आहेत.

2009 मध्ये झाली होती दोघांची लग्न

लता सभरवालशी लग्न करण्याआधी संजीव सेठ यांचं पहिलं लग्न अभिनेत्री रेशमा टिपनिससोबत झालं होतं. हे दोघं 2004 मध्ये वेगळे झाले होते. काही वर्षांनंतर संजीव आणि लता यांची भेट ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटवर झाली. जिथे त्यांनी एका विवाहित जोडप्याची भूमिका साकारली. त्यांच्या रील लाइफमधील केमिस्ट्रीने खरीखुरी प्रेमकथा निर्माण झाली आणि दोघांनी 2009 मध्ये लग्न केलं. त्यानंतर चार वर्षांनी, 2013 मध्ये त्यांना एक मुलगा झाला आणि ते पालक बनले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Tushar Ghadigaonkar Marathi Actor: नैराश्य, कौटुंबिक वाद की आणखी काही; फॅनला लटकलेला मृतदेह, अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्याचा शेवट का केला?

त्याच्याकडे काम नव्हते असं म्हणणे चुकीचे, मी अत्यंत जबाबदारीने लिहितोय; तुषार घाडीगावकरबाबत अभिनेत्याचा मोठा दावा