Yed Lagla Premacha Star Pravah Serial Track: स्टार प्रवाहच्या (Star Pravah) 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagla Premacha Serial) मालिकेत लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे (Actress Megha Ghadge) यांची एण्ट्री होणार आहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठा यापलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणारी विक्रांतिका रणशिंगे ही अतिशय रहस्यमय आणि प्रभावशाली व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत. 

Continues below advertisement

यशस्वी उद्योजिका, समाजसेविका आणि आदर्श नेता म्हणून ओळखली जाणारी विक्रांतिका प्रत्यक्षात सत्तेचे खेळ पडद्यामागून खेळणारी एक कुशल रणनीतीकार आहे. तिच्या एका फोनवर निर्णय बदलतात आणि अनेकांचं भविष्य नव्याने लिहिलं जाते. राजकारणी, वरिष्ठ अधिकारी, बिल्डर्स आणि उद्योगपती तिच्याशी संबंध जपण्यातच आपलं हित मानतात. विक्रांतिकाला माणसांची पारख आहे. समोरच्याला विश्वास देऊन जिंकायचं, गरज पडली तर भीती दाखवायची आणि विश्वासघात झाला तर कोणतीही दया न दाखवता त्याची किंमत वसूल करायची हा तिचा स्वभाव.        

Continues below advertisement

या भूमिकेविषयी सांगताना मेघा घाडगे म्हणाली की, "विक्रांतिका रणशिंगे ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे. जवळपास 20 वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करतेय. माझ्या स्वभावाशी मिळतं जुळतं हे पात्र आहे. सडेतोड उत्तर देणारी आणि अत्यंत करारी अशी ही भूमिका आहे. ऐकताक्षणीच मी या भूमिकेसाठी होकार दिला. विक्रांतिका प्रत्येक परिस्थितीचा विचार करून चाल खेळते. त्यामुळे प्रेक्षकांना तिचा पुढचा डाव काय असेल याची कायम उत्सुकता राहील. मला खात्री आहे विक्रांतिकाचं हे अनोखं रूप प्रेक्षकांना नक्कीच आवडेल..."                                               

विक्रांतिकाच्या येण्यानं राया-मंजिरीच्या आयुष्यात नवं वादळ येणार आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडणार? राया-मंजिरीच्या संसाराला पुन्हा कुणाची दृष्ट लागणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.                                                            

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Veen Doghatali Tutena: चिंगीला गरोदर करून अंशूमननं स्वानंदीच्या बहिणीला लग्न करून घरी आणलं; समरला प्रकार कळताच... Promo पाहिलात?

ABP Majha च्या बातम्या LIVE