Marathi Actress Varsha Dandale On Her Horible Accident: अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale) म्हणजे, मराठी टेलिव्हिजन (Marathi Television) विश्वातलं सर्वश्रुत नाव. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलंय. 'नवा गडी नवं राज्य', 'नांदा सौख्य भरे', 'नकटीच्या लग्नाला यायचं हं', 'पाहिले न मी तुला' यांसारख्या मालिकांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'नांदा सौख्य भरे' या मालिकेत वर्षा दांदळेंनी साकारलेली वच्छी आत्याची भूमिका आजही खूपच प्रसिद्ध आहे. नुकत्याच एका मुलाखतीत वर्षा दांदळे यांनी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच पर्सनल लाईफबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी वर्षा दांदळेंनी काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताबाबतच्या आठवणी सांगितल्या. ज्या ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. 

अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी 'त्या' भयावह अपघाताबाबत काय सांगितलं? 

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या करिअरसोबतच त्यांच्या भीषण अपघाताबाबतही सांगितलं. त्यावेळी अभिनेत्री वर्षा दांदळे म्हणाल्या की, "कार अपघात होता तो. आमची मित्रमंडळी अशी आम्ही चार जणं, एका कार्यक्रमाला नाशिकला गेलेलो. त्यावेळी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होता. भंडारदरावरून येताना, तिथे रेती टाकली होती वळणावर... असा सेम अपघात त्याच ठिकाणी झाला होता. अपघात झाल्यावर तर कित्येक तास आम्हाला काहीच कळत नव्हतं. तेव्हा आमच्यापैकी एक मित्र सुदैवानं बेशुद्ध पडला नव्हता. तो शुद्धीवर होता. त्याच्यामुळेच आम्ही वाचलो... मी एकाच जागेवर होते. मी आणि माझे इतर मित्र आम्ही बेशुद्ध होतो... कुणीच रस्त्यावर थांबायला तयार नाही, तिथे नेटवर्क नाही. मग एक माणूस भेटला, नंतर रुग्णवाहिका आली. अपघाताच्या दोन तासानंतर हे सगळं घडलं. त्यादिवशी मरण होतं... पण त्या माणसामुळे आम्ही वाचलो."

"माझी मुलगी नाशिकलाच राहते. ती फिजिओथेरपिस्ट आहे. तिने हॉस्पिटलमध्ये सगळा सेटअप तयार केला. पुढच्या दीड तासात आमचं स्कॅनिंग झालं. माझा पाय तुटून पडलेला. आता पूर्ण प्लेट आहे. माझा स्पायनल कॉर्ड तुटून बाहेर पडलेला. माझे दोन ऑपरेशन झाले. मित्राचेही दोन आणि मैत्रिणीचे दोन ऑपरेशन झाले. माझ्या मुलीने पटकन निर्णय घेतले त्यामुळे सगळं शक्य झालं. एकाच वेळी माझे दोन ऑपरेशन करायचे होते. त्यानंतर मी तीन महिने एकाच जागेवर होते. त्याच्यानंतर माझी फिजिओथेरिपी केली आणि मी सहा महिन्यात उभी राहिले.", असं अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aishwarya Rajesh Reveals Photographers Inappropriate Demand: 'मला तुझं उघडं शरीर पाहायचंय...', फोटोशूटवेळी फोटोग्राफरची 'नको ती मागणी'; अभिनेत्रीनं सांगितला वेदनादायी प्रसंग