Yashpal Sharma Gets Emotional Ladoo Screening:मुंबई: राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांच्या मराठी दिग्दर्शनातील पहिला चित्रपट 'लाडू' या सिनेमाचं विशेष कौतुक होत आहे. या सिनेमाच्या   विशेष स्क्रिनिंगनंतर प्रख्यात अभिनेते यशपाल शर्मा यांनी 'लाडू' या सिनेमाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.  भरभरुन कौतुक करत त्यांनी म्हटलं की, 'आजच्या काळातील अत्यंत धाडसी अन् मनाला स्पर्श करणारा हा सिनेमा आहे', असं त्यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

'लाडू' पाहून यशपाल शर्मांना अश्रु अनावर, भावुक होत सिनेमाचं केलं कौतुक (Yashpal Sharma Gets Emotional After Watching Ladoo)

शैलेंद्र सिंग दिग्दर्शित 'लाडू' या चित्रपटाविषयी बोलताना यशपाल शर्मा म्हणाले की, ''लाडू' या सिनेमाचं नाव आधी खूप साधं आणि सिंपल वाटलं. पण हा सिनेमा पाहिल्यानंतर या सिनेमामागचा गाभा आणि भावनिक अर्थ प्रकर्षाने जाणवला', असं  शैलेंद्र म्हणाले. 'आज ज्या काळात व्यावसायिक आणि वेगवान सिनेमांचा बोलबाला आहे, त्या काळात असा आशयप्रधान आणि प्रामाणिक चित्रपट बनवणं हेच मोठं धाडस आहे', असंही यशपाल शर्मा म्हणाले.  

चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, छायाचित्रण, संकलन आणि संगीताचं कौतुकही यावेळी त्यांनी केलं. 'लाडू या सिनेमाचा अनुभव एका कलाकृतीसारखा आहे', असंही त्यांनी सांगितलं. हा सिनेमा पाहत असताना ऋत्विक घटक, श्याम बेनेगल आणि सत्यजित रे यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या सिनेमांची आठवण झाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी यशपाल शर्मा भावुकही झाले. भावुक होत म्हणाले की, 'मला या सिनेमामुळे नाही, तर आजच्या काळात असा चित्रपट बनवण्याचं धाडस कुणी दाखवलं, याचा विचार करून डोळ्यात पाणी आलं', असंही यशपाल शर्मा म्हणाले.

Continues below advertisement

बॉस इंडिया एंटरटेनमेंट आणि ब्रेडविनर प्रोडक्शन्स प्रस्तुत, सत्य घटनेवर आधारित 'लाडू' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नेमकी कोणती कथा दाखवण्यात आली आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या निधनानंतर सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...