मुंबई :  बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम  (Yami Gautam) आज (4 जून) विवाहबंधनात अडकली आहे.  यामी गौतमने लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धरसोबत (Aditya Dhar) लगीनगाठ बांधली. यामीने स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली. आदित्यने देखील फोटो लग्नाचा फोटो शेअर केला आहे. 

यामी गौतमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये यामीने लाल रंगाची साडी नेसली आहे आणि आदित्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि पगडी घातली आहे. लग्नाचा फोटो शेअर करताना यामी म्हणाली की, "तुझ्यामुळे मी प्रेम करायला शिकले आहे. कुटुंबीयांच्या आशिर्वादाने आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा पार पाडला आहे." याच कॅप्शनसह  लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धरने देखील फोटो शेअर केला आहे. 

यामी गौतमने आदित्य धर दिग्दर्शित 'उरीः द सर्जिकल स्ट्राइक'या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात विकी कौशल मुख्य  भूमीकेत आहे. या चित्रपटाला लोकांनी पसंती दिली होती. या चित्रीकरणादरम्यान यामी गौतम आणि आदित्य धर यांच्यातील नात बहरल. पण दोघेही कधीच आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाही.

यामीने लग्नाचा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी लगेच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  यामीच्या लग्नाचा फोटो लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यामीने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले आहे. 

शिमलामध्ये ‘सनम रे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पुलकित सम्राट आणि यामी यांच्यातील नात्याची चर्चा होती. त्याचवेळी यामी आणि पुलकितची पत्नी श्वेता रोहिरा यांच्यात वाद झाला होता. यामी घर मोडणारी महिला असल्याचं श्वेता म्हणाली होती. विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवणं यामीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हतं. आई-वडिलांचं ऐकूनच यामीने पुलकित सम्राटशी वेगळं होण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा त्यावेळी होती.