Bigg Boss 14 : Rubina Dilaik बिग बॉस 14 ची विजेती बनली आहे. सोशल मीडियावर आधीच याबाबत शक्यता व्यक्त केली जात होती की यावेळची विजेती Rubina Dilaik असेल आणि तसंच झालं.
बिग बॉस १४ मधील रुबीनाचा प्रवास खूप मजेशीर होता. कधी प्रेक्षकांना रडवले तर कधी आपल्या मस्तीने हसवले. रूबीनाचा चेहरा टिव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध चेहरा आहे. सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग देखील जास्त आहे. नॉमिनेशनमध्ये जेव्हा रूबीनाचे नाव आले तेव्हा तिला कायम जास्त वोट मिळाले.
शोच्या सुरुवातीला रूबीनाला शोमध्ये डॉमेनिटिंग देखील म्हटले गेले आहे. शोमध्ये रूबीनाने तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेकवेळा चर्चा केली. तिची वैवाहिक जीवनात देखील प्रॉब्लेम सुरू होते. त्यामुळे रूबीना तीचा पती अभिनवशी घटस्फोटाचा देखील विचार करत होती.
घरात तिचे सर्वात मोठे भांडण राहुल वैद्यसोबतच झाले होते. आणि अंतिम फेरीतही दोघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. पण राहुल वैद्यला मागे सारत रुबिनाने बाजी मारली. बिग बॉसच्या घरात रुबिना डिलैकचा प्रवास खूप मजेशीर होता. पती अभिनव शुक्ला सोबत तिने घरात प्रवेश केला होता. तिचा आणि अभिनव यांचं नातं नाजूक स्थितीत आहे याची घरातील इतर सदस्यांना कल्पनाही नव्हती. ज्यावेळी घरात त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले तेव्हा सर्वांना हे ऐकून आश्चर्य वाटले. मात्र बिग बॉसच्या घरात आल्यानंतर रुबिना आणि अभिनव यांच्या नात्यात सुधारणा झाली, दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि आता त्यांचं नातं घट्ट बनलं आहे.
संबंधित बातम्या :