Netflix Adolescence Web Series: एक अशी सीरिज (Web Seres) आहे ज्याची जगभरात खूप चर्चा आहे. ते नेटफ्लिक्सवर (Netflix) सतत नवीन विक्रम करत आहे. आता ही नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय मालिका बनली आहे. या सीरिजनं 'स्ट्रिंजर थिंग्ज 3' लाही मागे टाकलं आहे. अशातच फिल्म प्रोड्यूसर सुधीर मिश्रा यांनी नेटफ्लिक्स शो 'अॅडलेसन्स' ला भारतीय प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या पसंतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'अॅडलेसन्स' (Adolescence) ला मिळालेल्या नंबर-वन रँकिंगवर शंका व्यक्त करताना ते म्हणाले की, "हा चित्रपट सामान्यतः ज्या पद्धतीने कथा सांगितली जाते त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे". नेमका सुधीर मिश्रा यांचा शोवरचा आक्षेप काय? यावर सविस्तर जाणून घेऊयात...
'अॅडलेसन्स'च्या पहिल्या क्रमांकाच्या रँकिंगवर सुधीर मिश्रा यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिलेली आणि भारतीय प्रेक्षकांना लक्षात ठेवून त्यांचं निरीक्षण सांगितलेलं. त्यांनी सांगितलं की, याची स्क्रिप्टिंग खराब होती. तसेच, या फिल्मची स्क्रिप्ट काही गोष्टींचं उल्लंघनसुद्धा करते.
'अॅडलेसन्स' नेटफ्लिक्स इंडियावरचा नंबर 1 शो
सुधीर मिश्रा यांनी लिहिलंय की 'अॅडलेसन्स' हा नेटफ्लिक्स इंडियावरील नंबर 1 शो बनला आहे, जी खरोखरंच आश्चर्याची बाब आहे. सामान्यतः असं मानलं जातं की, भारतीय प्रेक्षकांना संथ गतीच्या फिल्म्स किंवा सीरिज आवडत नाहीत, परंतु या कार्यक्रमानं ती धारणा मोडीत काढली. हा शो पटकथालेखनाच्या पारंपारिक नियमांचंही उल्लंघन करतो आणि कथा वर जाण्याऐवजी खालच्या दिशेनं जाते.
सुधीर मिश्रा यांचं म्हणणं नेमकं काय?
सुधीर मिश्रा 'धारावी' (1992), 'हजारों ख्वैशीं ऐसी' (2003), 'चमेली' (2004), आणि 'सिरीयस मेन' (2020) सारख्या शानदार चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी कबूल केलंय की, सहकारी चित्रपट निर्माते हंसल मेहता आणि शेखर कपूर यांच्याकडून प्रशंसा मिळाल्यानंतर त्यांनी हा शो पाहिला.
'अॅडलेसन्स' रचतेय रेकॉर्डवर रेकॉर्ड
'अॅडलेसन्स' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यापासून ही सीरिज चर्चेत आहे. ब्रिटिश पंतप्रधानांसह अनेक सेलिब्रिटींनी या सीरिजचं कौतुक केलं आहे. ही मालिका नेटफ्लिक्सच्या आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय इंग्रजी भाषेतील टीव्ही सीरिजमध्ये नवव्या क्रमांकावर आहे, ज्याला 96.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर स्ट्रेंजर थिंग्ज 3 ला 94.9 मिलियन व्ह्यूज मिळाले आणि हा शो आता 10 व्या क्रमांकावर आला आहे.
'अॅडलेसन्स'ची विक्रमी कामगिरी
'अॅडलेसन्स' प्रदर्शित झाल्यानंतर 17 दिवसांत 96.7 दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिला. नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला शो अजूनही स्क्विड गेम्स आहे. Top 10 Most Popular Shows बद्दल बोलायचं झालं तर, वेन्सडे पहिल्या क्रमांकावर आहे, स्ट्रेंजर थिंग्ज 4 दुसऱ्या क्रमांकावर आहे, DAHMER: Monster: The Jeffrey Dahmer Story तिसऱ्या क्रमांकावर आहे, Bridgerton: Season 1 चौथ्या क्रमांकावर आहे आणि द क्वीन्स गॅम्बिट पाचव्या क्रमांकावर आहे.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :