web series : जर तुम्हाला क्राइम  थ्रिलर  सिनेमांचा आणि वेब सिरीज (web series) पाहाण्याची आवड असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त वेब सिरीज घेऊन आलो आहोत, ज्याची कथा, अभिनय आणि दिग्दर्शन सगळंच जबरदस्त आहे. ही सिरीज (web series) तुम्ही नक्कीच पाहायला हवी. चला तर मग तिच्याबद्दल सांगतो.

Continues below advertisement


ही आहे 2022 मधील एक मेडिकल थ्रिलर वेब सिरीज, ज्यामध्ये ना कोणता मोठा सुपरस्टार होता. ना या वेबसिरीज कोणी प्रमोट केले होते.. पण कंटेंट आणि टीम इतकी ताकदवान होती की प्रेक्षकांनी तिला भरपूर पसंती दिली. IMDb वरही प्रेक्षकांनी तिला चांगली रेटिंग दिली आहे.


या वेब सिरीजचं नाव आहे ‘ह्यूमन’, ज्यामध्ये शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहेत. दोघींनीही खूपच दमदार अभिनय केला असून त्यांच्या अभिनयामुळे ही सिरीज पाहण्यासारखी बनते.


मेडिकल क्षेत्रातील काळे कारनामे दाखवणारी सिरीज


‘ह्यूमन’ या सिरीजमध्ये मेडिकल क्षेत्रातील काळं वास्तव उघड केलं आहे. रुग्णालयांच्या मोठमोठ्या इमारतींच्या मागे कसे काळे धंदे चालतात, हे दाखवण्यात आलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, फार्मा कंपन्यांच्या ह्यूमन ट्रायल्सवर आधारित ही कथा आहे.


कुठे पाहाता येईल?


जर तुम्हालाही ‘ह्यूमन’ पाहायची असेल, तर ती तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. याचे एकूण 10 एपिसोड्स आहेत. पण एकदा तुम्ही सुरुवात केली, की संपूर्ण सिरीज संपेपर्यंत स्क्रीनवरून नजर हटणार नाही.


कास्टिंगबाबत बोलायचं झालं, तर ‘ह्यूमन’मध्ये शेफाली शाह, कीर्ती कुल्हारी, विशाल जेव्हा, रिद्धी कुमार, इंद्रनील सेनगुप्ता, श्रुती बापना, सीमा बिस्वास, आसिफ खान आणि राम कपूर यांसारखे कलाकार आहेत.


IMDb वर प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद 


‘ह्यूमन’ला IMDb वर 7.6 रेटिंग मिळालं आहे. अनेक युजर्सनी आपले रिव्ह्यू देखील शेअर केले आहेत – काहींनी तिला मास्टरपीस म्हटलं, तर काहींनी मेडिकल क्षेत्राशी संबंधित सर्वोत्तम सिरीज असं वर्णन केलं आहे.






इतर महत्त्वाच्या बातम्या 


Karisma Kapoor Claims Sunjay Kapur 30,000 Crore Estate: करिष्मा कपूरनं मागितला घटस्फोटीत पती संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा? 30 हजार कोटींच्या प्रॉपर्टीवरुन मोठा वाद