Aditya Singh Reacts to Chaos at Bihar Wedding: बिहारमधील (Bihar) मोकामा येथील आमदार अनंत सिंह (Anant Singh) यांची मुलगी शिवांगी सिंह (Shivangi Singh) हिचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.  या लग्न सोहळ्यात दिग्गज व्यक्तींची हजेरी पाहायला मिळाली.  या लग्नसोहळ्यासाठी खास संपूर्ण गाव सजवण्यात आले होते. या लग्नातील अनेक व्हिडीओ आणि फोटोस व्हायरल झाले आहेत. दरम्यान, या व्यतिरिक्त या लग्नातील अनेक धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत.  व्हायरल व्हिडीओ पाहून, टीव्ही अभिनेता विशाल आदित्य सिंह (Vishal Aditya Singh) याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने व्हायरल व्हिडीओ पाहून नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. लग्नसोहळ्यात नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

आमदाराच्या मुलीच्या लग्नात गोंधळ (Vishal Aditya Singh Slams Guests Over Food Chaos)

Continues below advertisement

अनंत सिंह यांच्या लेकीचं लग्न बिहारमधील सर्वात भव्य सोहळ्यांपैकी एक मानले जात आहे.  या लग्नसोहळ्यात लाखो लोकांची उपस्थिती पाहायला मिळाली. लाखो लोकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. लग्न सोहळ्यात प्रचंड गर्दी झाली होती.  दरम्यान, जेवणाच्या काऊंटरवर गदारोळ निर्माण झाला होता. लोक एकमेकांना ढकलत होते. काही व्हिडीओंमध्ये लोक जेवणासाठी  भांडताना तर, काहीजण एकमेकांकडे जेवण हिसकावून घेताना दिसत होते.  सध्या आमदाराच्या लेकीच्या लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस फेम विशाल आदित्य सिंह हा देखील बिहारचा रहिवासी आहे.  अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी सिंहच्या लग्नात अन्न फेकल्याच्या प्रकारावर विशालने नाराजी तसेच संताप व्यक्त केला आहे.  या भव्य सोहळ्यात मेजवानीदरम्यान, पाहुण्यांच्या गैरवर्तनावर अभिनेत्याने  टीका तसेच संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे बिहारची बदनामी होत असल्याची खंत त्याने व्यक्त केली. अभिनेत्याने व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत त्याने म्हटलं की, 'आपण कधीच सुधारणार नाही. कुठे सुधारणार? जर सुधारलो तर, हे सगळं करणार कोण? आणि आपल्याला असं कोणतं जेवण मिळत होतं? कोणता रसगुल्ला, डाळ - भात? असं तर, नाही हे जेवण लंडन किंवा फ्रान्समधून आणलं आहे.  असं तर नाही, कोणत्या दुसऱ्या विश्वातून आणलं आहे. प्रत्येकाला कॉमन सेन्स असायला हवे', असं अभिनेता म्हणाला.

'लोक तिथे नक्की काय बघायला गेले होते. लग्न कुणी पाहिलं का?', असा सवालही त्याने यावेळी उपस्थित केला. सध्या विशालचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Vivek Oberoi Salman Khan: सलमान-विवेकमधील जुना वाद संपला? अभिनेत्याने भाईजानच्या सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला 'हा' सिनेमा नक्की पाहा