Vindu Dara Singh Says On Mukul Dev Death: कोरोनाच्या भितीनंच घेतलाय मुकुल देवचा जीव, 125 किलो झालेलं वजन, 'सन ऑफ सरदार 2'च्या को-स्टारचा खळबळजनक खुलासा
Vindu Dara Singh Says On Mukul Dev Death: 'सन ऑफ सरदार 2' मधील मुकुल देवचा सहकलाकार आणि मित्र विंदू दारा सिंहनं एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Vindu Dara Singh Says On Mukul Dev Death: प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव (Actor Mukul Dev Passed Away) यांच्या अचानक झालेल्या निधनानं संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांसोबतच, इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींवरही दुःखाचा डोंगर कोसळला. विंदू दारा सिंगपासून ते अजय देवगण, मनोज बाजपेयी, सुष्मिता सेन आणि विक्रम भट्टपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मुकुल देवच्या निधनावर शोक व्यक्त केला. आगामी सिनेमा 'सन ऑफ सरदार 2' (Son Of Sardaar 2) मध्ये मुकुल देव (Mukul Dev) झळकणार होता. त्याचं शुटिंगही त्यानं पूर्ण केलेलं. पण, दुर्दैवानं मुकुल देव आता त्याचा चित्रपट पाहू शकणार नाही. दरम्यान, विंदू दारा सिंहनं मुकुल देव आणि 'सन ऑफ सरदार 2'सोबत धक्कादायक खुलासा केलाय.
'दैनिक भास्कर'ला दिलेल्या मुलाखतीत विंदू दारा सिंह यांनी मुकुल देव यांच्या मृत्यूचं कारणच सांगितलं नाही, तर त्यांच्या प्रकृतीबद्दलही सांगितलं. 'सन ऑफ सरदार 2' मध्ये मुकुल देवची भूमिका किती महत्त्वाची होती आणि कथा कशी असेल, याबाबतही विंदू दारा सिंह यांनी खुलासा केला आहे.
विंदू दारा सिंह म्हणाले की, मुकुल स्वतःची काळजी घेत नव्हता
'सन ऑफ सरदार 2'च्या सेटवर मुकुल देवसोबतचा त्याचा अलिकडचा अनुभव आणि तो अभिनेता कोणत्या स्थितीत होता हे विंदू दारा सिंहनं स्पष्ट केलं. विंदू दारा सिंहवर विश्वास ठेवायचा तर, मुकुल देव स्वतःची काळजी घेत नव्हता. तो म्हणाला की, 'मी त्याच्यासोबत (मुकुल देव) भाग 2 (सन ऑफ सरदार 2) साठी एक महिना घालवला. मला जाणवलं की, तो त्याच्या तब्येतीची काळजी घेत नव्हता. मुकुल देव त्याचा सुपरहिट चित्रपट पाहू शकणार नाही, याचं मला खूप दुःख होतंय.
'डिप्रेशननं ग्रस्त होता, वजन 125 किलोपर्यंत वाढलेलं'
विंदू दारा सिंह पुढे म्हणाले की, 'मुकुल पूर्वी नैराश्यात होता आणि त्याचं वजन 125 किलोपर्यंत वाढलेलं. विंदूच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो शूटिंग संपवून परतला तेव्हा त्याला वाटलं की, मुकुल देव तंदुरुस्त झाला आहे. त्याचं वजन जास्त कमी होईल. पण तसं अजिबात घडलं नव्हतं. त्याचं वजन पुन्हा वाढलेलं.'
मुकुल देव कोरोनाला घाबरलेला
विंदू दारा सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड काळानंतर मुकुल देव खूप घाबरले होते. त्यांच्या मनात कोविडची भीती नेहमीच होती. विंदूच्या म्हणण्यानुसार, त्यानं आणि इतरांनी मुकुलला गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्याला एक महिना व्यायाम करायला लावला, त्यानंतर मुकुल तंदुरुस्त झाला. त्याचं वजन 125 वरून 120 किलोपर्यंत वाढलं होतं, पण ते पुन्हा सामान्य झालं.
लूक टेस्टसाठीही नव्हता आला मुकुल देव, आजारी होता
विंदू दारा सिंहनं सांगितलं की, गेल्या आठवड्यात 'सन ऑफ सरदार 2'साठी लूक टेस्ट होती, ज्यासाठी संपूर्ण स्टार कास्ट पोहोचली होती. पण, मुकुल गेव आला नाही, कारण तो आजारी होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं.
मुकुल देव एकाकी पडलेले
विंदू दारा सिंहनं सांगितलं की, त्याच्या पालकांच्या निधनानंतर मुकुल देव खूप एकटा पडलेला. त्याचा पत्नीपासून घटस्फोट झाला होता. त्याला एक मुलगी आहे, जी परदेशात राहते. विंदूच्या म्हणण्यानुसार, मुकुल देवला एक भाऊ राहुल आणि वहिनी मुग्धा गोडसे देखील आहेत, पण तरीसुद्धा तो एकटाच राहत होता. मुकुल देव गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीतील रुग्णालयात दाखल होता आणि 23 मे रोजी रात्री त्याला हृदयविकाराचा झटका आला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























