Vikas Samudre on Sachin Pilgaonkar trolling: सध्या सोशल मीडियाचा वापर वाढत चालला आहे. नेटकरी आपल्या  प्रतिक्रिया थेट मांडतात. कधी कधी आपल्याला नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात.  सध्या समाजमाध्यमांमध्ये कलाकारांना प्रचंड  ट्रोल केलं जातं. त्यांच्या अभिनयासाठी किंवा  त्यांच्या वक्तव्यावर टीका केली जाते.  काही कलाकार ट्रोलिंगकडे थेट दुर्लक्ष करतात, तर काही सडेतोड उत्तर देतात.  या ट्रोलिंगच्या जाळ्यात अभिनेता सचिन पिळगावकरही सापडले आहेत. त्यांना बऱ्याचदा त्यांच्या वक्तव्यावरुन ट्रोल केलं जातं. या ट्रोलिंगवर अनेक कलाकारांनी आतापर्यंत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ट्रोलर्सची कानउघाडणी केली आहे. काहींनी या ट्रोलिंगवर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. दरम्यान, अलिकडेच सचिन पिळगावकरांच्या सिनेमात काम करणाऱ्या प्रसिद्ध कलाकाराने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

सचिन पिळगावकर यांचा नवरा माझा नवसाचा हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं. तसेच अभिनेता विकास समुद्रे यानं देखील महत्त्वाची भूमिका साकारली.  त्यानं अलिकडेच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगबद्दल आपलं थेट मत व्यक्त केलं. 'सचिन पिळगावकर यांना आता ट्रोल केलं जातं. हे आधीही घडलं असतं, जर तेव्हा सोशल मीडिया असतं. शोले चित्रपटादरम्यान, सचिन पिळगावकर यांनी कशी मदत केली, हे तुम्ही आता समाजमाध्यमांमवर ऐकता. हे आम्ही 22 वर्षांपूर्वीच ऐकलं.  तीच गोष्ट जर खोटी असेल, तर माणूस कट टू कट 20 वर्षांनी कसं बोलेल?'.

'सचिन पिळगावकर हे मोठे कलाकार आहेत. त्यांनी राज कपूर, गुरुदत्त यांसारख्या दमदार कलाकारांसोबत काम केलंय. लहानपणीच त्यांना अनेक अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले आहे.  गुरुदत्त यांच्यासोबत ते सिनेमा करणार होते.  गुरुदत्त यांनी सांगितलं, सहा वर्षांच्या मुलाचं कॅरेक्टर आहे. पण तेव्हा सचिन पिळगावकर चार वर्षांचे होते.  तेव्हा त्यांनी अगदी प्रांजळपणे विचारलं, आप नहीं लेंगे मुझे इस सिनेमा मैं? तेव्हा गुरुदत्त, नही मैं 2 साल वेट करुंगा असं म्हणाले होते.  त्यांच्यासाठी हा सिनेमा थांबवला होता. दरम्यानच्या काळात गुरुदत्त यांचं निधन झालं होतं.  मग त्यांच्या भावाने हा चित्रपट पूर्ण केला.  सचिन पिळगावकर यांना घेऊन त्यांनी हा चित्रपट कंप्लीट केला.  त्यांना ट्रोल केलं जातं, याचं मला खरंच वाईट वाटतं', असं विकासने मुलाखतीत सांगितलं.

Continues below advertisement

'मी खात्रीनं सांगतो, पन्नाशीतला किंवा साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकर यांना ट्रोल करत नाहीये.  ही Gen Z पिढी त्यांना ट्रोल करत आहे.  कारण त्यांनी अजूनही सचिन पिळगावकर यांना नीट ओळखलेलं नाही. त्यांचा  AURA वेगळा आहे.  हिंदीतील अमिताभ बच्चन, दिलीप कुमार,  यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत सचिनं यांचं उठणं  बसणं असतं. तर, त्यांचा ऑरा असणारच ना...लहानपणापासून त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केलंय. त्यांना जेव्हा ट्रोल केलं जातं, तेव्हा खरंच  वाईट वाटतं', असं अभिनेता म्हणाला.