एक्स्प्लोर

Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: 14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?

Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: विजयेंद्र कुमेरिया यानं सांगितलं की, त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बदल समजून घेण्यास आणि ते स्वीकारण्यास त्याला वेळ लागलाय, म्हणूनच याबद्दल जाहीरपणे बोलण्यापूर्वी त्यानं स्वतःला थोडा वेळ दिला.

Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याचा (Television Actor) संसार अखेर मोडला असून यासंदर्भात त्यानं स्वतः माहिती दिली आहे. टीव्ही अभिनेता विजयेंद्र कुमेरिया (Television Actor Vijayendra Kumeria) यानं अखेर आपल्या वैवाहिक आयुष्यातल्या अडचणी आणि विभक्त होण्यावर मौन सोडलं आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना त्यानं पत्नी प्रीती भाटियासोबत घटस्फोट झाल्याचं जाहीर केलं. 

विजयेंद्र आणि प्रीती यांनी 2012 मध्ये लग्न केलेलं आणि त्यांना किमाया नावाची मुलगी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांच्या विभक्त होण्याबाबतच्या चर्चा बऱ्याच काळापासून ऑनलाइन सुरू होत्या. आता 'नागिन' फेम अभिनेत्यानं घटस्फोटाला दुजोरा दिला असून, हे जोडपं गेल्या चार वर्षांपासून वेगळं राहत असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

विजयेंद्र कुमेरिया आणि प्रीती भाटिया यांचा घटस्फोट (Vijayendra Kumeria Divorced)

'टेली टॉक इंडिया'ला दिलेल्या एका अलीकडील मुलाखतीत विजयेंद्र कुमेरियानं प्रीती भाटियाला घटस्फोट दिल्याचं जाहीर केलं. त्यांच्या विभक्त होण्याबाबतची बातमी सर्वात आधी मार्च 2023 मध्ये समोर आली होती. त्यावेळी प्रीतीनं इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टीक पोस्ट (Cryptic Post) शेअर केली होती. मुलगी किमायासोबतचा फोटो पोस्ट करताना तिनं लिहिलं होतं की, "तू मला सांगितलेल्या सर्व खोट्या गोष्टींपैकी 'आय लव्ह यू' (I love you) हे मला सर्वात जास्त आवडलेलं. 'आय मिस यू' हे दुसऱ्या क्रमांकावर होतं. तुझी खूप आठवण येतेय..."

विजयेंद्र कुमेरिया आणि प्रीती भाटिया यांच्या घटस्फोटाचं कारण काय? 

मुलाखतीत बोलताना विजयेंद्र कुमेरिया यानं सांगितलं की, त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बदल समजून घेण्यास आणि ते स्वीकारण्यास त्याला वेळ लागलाय, म्हणूनच याबद्दल जाहीरपणे बोलण्यापूर्वी त्यानं स्वतःला थोडा वेळ दिला. स्वभावानुसार खाजगी आयुष्य जपणाऱ्या व्यक्तीला सुरुवातीला या परिस्थितीचा सामना करणं कठीण गेलं. मात्र, कालांतरानं त्याला असं वाटलं की, लोकांनी स्वतःचे निष्कर्ष काढून देण्यापेक्षा मोकळेपणानं बोलून परिस्थिती स्पष्ट करणं अधिक योग्य ठरेल. 

विजेंद्रनं स्पष्ट केलं की, वेगळं होण्याचा निर्णय त्यानं आणि प्रीतीनं काही एका रात्रीत घेतलेला नव्हता. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नात्यात काही काळापासून अडचणी येत होत्या आणि त्यांचे मतभेद आणि जुळवून घेण्याबाबतच्या समस्या सोडवणं अधिकाधिक कठीण होत चाललं होतं. अखेरीस, 2022 मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला, "असे निर्णय एका रात्रीत घेतले जात नाहीत. आमच्यात अनेक मतभेद आणि जुळवून घेण्याबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या, ज्या कालांतरानं वाढतच गेल्या. आम्ही आमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही, पण गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि 2022 मध्ये आम्ही वेगळे झालो. हा परस्पर संमतीनं घेतलेला निर्णय होता आणि आम्हाला 2025 मध्ये कायदेशीर आदेश प्राप्त झाला."

विजेंद्रनं मुलगी किमायाबद्दल काय म्हणाला? 

विजेंद्रने नमूद केलं की, घटस्फोटाचा निर्णय परस्पर संमतीने घेतला असला तरी तो कठीण होता, कारण त्यांना 'किमाया' नावाची 10 वर्षांची मुलगी आहे. त्यानं सांगितलं की, त्यानं आणि प्रीतीनं अनेक वर्ष त्यांच्या समस्या सोडवण्याचा आणि नाते टिकवण्याचा प्रयत्न केला, विशेषतः किमायासाठी, पण अखेरीस त्यांना जाणीव झाली की, वेगळं राहिल्यानं त्यांच्या मुलीला अधिक चांगलं वातावरण मिळेल. 'उडान' फेम अभिनेत्यानं पुढे सांगितलं की, इतर कोणत्याही पालकांप्रमाणेच त्याला आणि प्रीतीलाही त्यांची मुलगी किमाया हिचं हितच साधायचं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Sharad Kapoor : 'जोश' चित्रपट गाजवणारा खलनायक आर्थिक अडचणीत, पाळीव कुत्रेही एनजीओकडे पाठवले; मदतीला सलमान खान आणि सोनू सूद धावले
'जोश' चित्रपट गाजवणारा खलनायक आर्थिक अडचणीत, पाळीव कुत्रेही एनजीओकडे पाठवले; मदतीला सलमान खान आणि सोनू सूद धावले
Dipali Sayyed : रुपाली चाकणकराचा नाव, फोटो अन् स्टाईलवर ट्रेडमार्क; आ बैल मुझे मार... त्यांचा सल्लागार कोण आहे? दिपाली सय्यद यांचा सवाल, बायकांच्या साडीचाही विषय काढला
रुपाली चाकणकराचा नाव, फोटो अन् स्टाईलवर ट्रेडमार्क; आ बैल मुझे मार... त्यांचा सल्लागार कोण आहे? दिपाली सय्यद यांचा सवाल, बायकांच्या साडीचाही विषय काढला
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Lalit Modi : आयपीएलचा संस्थापक आणि पळपुटा ललित मोदी बनला ब्रिटनचा नागरिक, फोटो शेअर करत म्हणाला 'हे नवं घर'
आयपीएलचा संस्थापक ललित मोदी बनला ब्रिटनचा नागरिक, फोटो शेअर करत म्हणाला 'हे नवं घर'
Devendra Fadnavis Chhat puja: छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
Embed widget