Vijay Varmas Valentine Surprise Goes Viral: बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो.  काही काळापूर्वी विजय वर्मा तमन्ना भाटियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. दरम्यान, लवकरच ते विभक्त झाले. त्या दोघांचे ब्रेकअप झाले.  आता विजय वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चेत येण्यामागचं कारण तमन्ना भाटिया नसून,  एक फोटो आहे. व्हॅलेन्टाईन डे निमित्त विजय वर्मानं  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेली स्टोरी लक्ष वेधून घेत आहे.  विजय वर्माने शेअर केलेल्या स्टोरीमधील फोटोमध्ये, एका मुलीचा  हात दिसत आहे. विजय मुलीचा हात धरुन असल्याचं दिसून येत आहे. 

Continues below advertisement

तमन्ना भाटियासोबत ब्रेकअप झाल्यापासून दोघांची प्रचंड चर्चा झाली. दरम्यान, अभिनेता आता नेमकं कुणाला डेट करत आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विजयने व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एका मुलीसोबतचा फोटो शेअर करून अफवांना खतपाणी घातले आहे. हा फोटो पाहिल्यानंतर, नेटकऱ्यांना शंका येऊ लागली आहे की, विजय कदाचित कुणाला तरी डेट करत असेल. पण सत्य वेगळंच समोर आलं.

 

Continues below advertisement

14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेन्टाईन डे रोजी, विजयनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे.  या पोस्टमध्ये तो एका मुलीचा हात धरलेला दिसत आहे. या फोटोवर विजय वर्माने एक कॅप्शन लिहिले आहे, 'Happy Valentines day to my forever', असं कॅप्शन त्यानं लिहिले. विजय वर्माने फोटोमध्ये खुशी  अहुजा नावाच्या एका मुलीलाही टॅग केलं आहे. ही स्टोरी पाहून, ही खुशी अहुजा कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वांना उत्सुकता होती. 

जेव्हा चाहत्यांनी विजय वर्माची स्टोरी पाहिली आणि खुशी वर्माच्या अकाऊंटला जाऊन भेट दिली, तेव्हा त्यांना आढळले की, विजयने प्रँक केला आहे.  खुशी अहुजा नावाच्या या पेजवर एक फोटो पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टवर, 'तुला मूर्ख बनवण्यात आले आहे', असं लिहिलं आहे. यावरून असे सूचित होते की, विजय वर्माने व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी नेटकऱ्यांसोबत प्रँक केले आहे.  सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे.