Vijay Sethupathi Movie : भारतामध्ये जेव्हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटांची चर्चा होते, तेव्हा ‘दृश्यम’, ‘कहानी’, ‘Andhadhun’ अशा चित्रपटांचा उल्लेख होतो. पण वर्षभरापूर्वी आलेला एक चित्रपट सध्या परदेशातही चर्चेत आहे. IMDb ने या चित्रपटाला 8.5 रेटिंग दिले आहे. या चित्रपटाच्या कथेत अनेक कथा दडलेल्या आहेत, ज्या कधी हसवतात, कधी डोळ्यात पाणी आणतात आणि प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणतात. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला असून ओटीटीवर रिलीज झाल्यानंतरही तो ट्रेंडिंगमध्ये आहे.

चित्रपटाची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी तो चीनमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. 29  नोव्हेंबर 2024 रोजी हा चित्रपट चीनमध्ये रिलीज करण्यात आला होता. यासाठी 40 हजार स्क्रिन उपलब्ध करण्यात आल्या होत्या. चीनमध्ये याचे टायटल होतं – ‘Yin Guo Bao Ying’. मेगा रिलीजपूर्वी काही ठिकाणी याचे प्रिव्ह्यू दाखवण्यात आले होते, जिथे त्याला मोठी दाद मिळाली. फक्त स्पेशल स्क्रिनिंगमधूनच या चित्रपटाने 2 कोटी रुपये कमावले आहेत. चीनमध्ये या चित्रपटाला 8.7 रेटिंग मिळाले आहे, जे मागील काही वर्षांत प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटांच्या तुलनेत खूप जास्त आहे. दमदार कथा आणि प्रमुख कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तो भारताचा नंबर 1 सस्पेन्स-थ्रिलर ठरला आहे.

‘दंगल’चा विक्रम मोडण्याची शक्यता

चित्रपटाची लोकप्रियता पाहता असं वाटतं की, चीनमध्ये जर याने ‘दंगल’चा विक्रम मोडला तरी त्यात आश्चर्य वाटायला नको. ‘दंगल’ ही तेथे सर्वाधिक कमाई करणारी भारतीय फिल्म आहे. आपण विजय सेतुपतीच्या ‘महाराजा’ या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, जो 14 जून 2024 रोजी पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्याने 110 कोटी रुपये कमावले होते. प्रमुख अभिनेता विजय सेतुपती यांची गणना आता ग्लोबल स्टारमध्ये होत आहे. या चित्रपटात विजय सेतुपतीसोबतच अनुराग कश्यप, ममता मोहनदास आणि नटराज यांनी महत्त्वाची भूमिका केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन निथिलन स्वामीनाथन यांनी केले आहे.

स्क्रीनपासून नजर हटू देत नाही अशी कथा

‘महाराजा’ हा मूळतः एक तमिळ चित्रपट असून तो इतर भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. कथानक एका सलून चालवणाऱ्या आयुष्याभोवती फिरते, जो डस्टबिन हरवल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातो. मात्र, पोलिसांना त्यामागचं खरं कारण समजतं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये असे अनेक धक्कादायक खुलासे होतात की, प्रेक्षकांना खलनायकाबाबत (अनुराग कश्यप) सहानुभूती वाटू लागते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, तटकरेंच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न