अफेअरही सिक्रेट, साखरपुडाही गुपचूप! रश्मिकासोबतच्या एन्गेजमेंटच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच विजय देवरकोंडा स्पॉट, हातातल्या अंगठीवर खिळल्या नजरा
Vijay Devarkonda Ring Viral: दोघेही इंडस्ट्रीतील सर्वात गोड जोडपे समजले जाते . दोघांनी साखरपुडाही खाजगी ठेवल्याचं दिसून आलं .

Rashmika Mandanna Vijay Devarkonda Engagement Ring: टॉलीवूड अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे . गेल्या काही दिवसांपासून त्याने रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna ) सोबत साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं . दसऱ्याच्या धुमधडाक्यात हा साखरपुडा गुपचूप आटोपल्याची चर्चा होती .रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या साखरपुड्याच्या खबरांनी सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला . (Vijay Devarkonda Ring Viral)
विजय आणि रश्मिका दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचंही कळाल्यानं चाहत्यांना आनंद अनावर झाला . मात्र, दोघांनीही अधिकृतपणे कोणतीही पोस्ट न केल्याने नक्की साखरपुडा झालाय की नाही हे कळायला मार्ग नव्हता . मात्र, साखरपुड्याच्या चर्चेनंतर पहिल्यांदाच अभिनेता विजय देवरकोंडा स्पॉट झाला . एका मंदिरात आपल्या कुटुंबासह तो आला होता . त्यावेळी चाहत्यांना त्याच्या हातातली साखरपुड्याची अंगठी दिसली. हे फोटो सोशल मीडियावर टाकत चाहत्यांनी विजय आणि रश्मिकाचा अभिनंदन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत . रश्मिका आणि विजय आपल्या डेटिंग लाईफबाबतही प्रचंड गुप्तता पाळताना दिसले आहेत . दोघेही इंडस्ट्रीतील सर्वात गोड जोडपे समजले जाते . दोघांनी साखरपुडाही खाजगी ठेवल्याचं दिसून आलं .
विजय देवरकोंडाची साखरपुड्याची अंगठी व्हायरल
रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या चर्चा व्हायरल होत असताना आता विजय देवरकोंडा आपल्या कुटुंबासह श्री सत्य साईबाबा प्रशांती नीलयम यांच्या आश्रमात नुकताच आला होता . यावेळी विजयचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .पुष्पगुच्छ घेताना चहा त्यांनी विजयाच्या हातात साखरपुड्याची अंगठी पाहिली . त्यावेळी त्यांनी राखाडी रंगाचा टी-शर्ट घातला होता .
Congratulations my lovess🥹🥹❤️@TheDeverakonda @iamRashmika
— :) (@rwdyrushiee) October 5, 2025
The engagement ring🥹🧿#VijayDeverakonda #RashmikaMandanna #virosh pic.twitter.com/Dy66lkSXZg
विजय आणि रश्मिका बऱ्याच काळापासून सोबत आहेत. तथापि, त्यांनी कधीही त्यांच्या नात्याची अधिकृतपणे कबुली दिली नाही किंवा सार्वजनिकरित्या याबद्दल बोलले नाही. या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनुसार, ते पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये (Rashmika Vijay marriage rumors) लग्न करू शकतात. लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. मीडिया रिपोर्ट नुसार विजय देवरकोंडा अलीकडेच त्याच्या आगामी चित्रपटाच्या लॉन्चिंग पूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी कृष्णा जिल्ह्यातील एका प्रसिद्ध मंदिराला भेट देण्यासाठी आला होता .त्यावेळी त्याचे कुटुंबातील सदस्यही त्याच्यासोबत होते .


















