Rashmika mandanna Vijay Devarkonda: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूर येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्न सोहळा अत्यंत खासगी स्वरूपात पार पडणार असून ठिकाणाबाबतही विशेष गोपनीयता पाळण्यात आली आहे.

Continues below advertisement

अरावली पर्वतरांगांमध्ये भव्य आयोजन

लग्नासाठी उदयपूरपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर अरावली पर्वतरांगांमध्ये वसलेल्या आलिशान रिसॉर्टची निवड करण्यात आली आहे. ही मालमत्ता पूर्णपणे खाजगी असून येथे 117 प्रायव्हेट व्हिला, तलाव-नदी परिसर आणि स्वतंत्र हेलिपॅडची सुविधा आहे. संपूर्ण इस्टेट बाहेरील नजरेपासून दूर असल्यामुळेच या ठिकाणाची निवड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

100 पाहुणे, तीन दिवसांचा सोहळा

लग्नसोहळा तीन दिवसांचा असणार आहे. एकूण पाहुण्यांची संख्या जवळपास 100 इतकी मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे 50 जण कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी असतील. हे सर्व जण व्यावसायिक विमानाने उदयपूरला पोहोचणार आहेत. मोठ्या प्रमाणावर बॉलिवूड किंवा साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार नसल्याचं समजतं. मात्र काही राजकीय मान्यवर आणि निवडक दिग्दर्शक उपस्थित राहू शकतात.

Continues below advertisement

‘VIROSH’ नावाची खास ओळख

या जोडीच्या चाहत्यांनी विजय आणि रश्मिकाच्या नावांपासून ‘VIROSH’ हे नाव तयार केलं होतं. त्याच नावावरून लग्नसोहळ्याला “The Wedding of VIROSH” असं शीर्षक देण्यात आलं आहे. दोघांनी सोशल मीडियावर चाहत्यांचे आभारही त्यांनी मानले आहेत. 

कडेकोट सुरक्षा, मोबाइलवर बंदी

लग्न पूर्णपणे खासगी राहावं यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा एजन्सीची मदत घेतली आहे. राजस्थान पोलिसांच्या समन्वयाने संपूर्ण ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असेल. सोहळ्यात मोबाइल आणि कॅमेऱ्यांवर सक्त मनाई असणार आहे, जेणेकरून कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये. अलीकडेच रश्मिका आणि विजय उदयपूरसाठी रवाना होताना विमानतळावर दिसले होते.