Vicky Kaushal Chhaava Movie: 'छावा' (Chhaava Movie) रिलीज झाला आणि देशभरातील जवळपास सारेच थिएटर्स 'हर हर महादेव'च्या (Har Har Mahadev) घोषणांनी दुमदुमून गेली. 'छावा'मध्ये बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) विक्की कौशलनं (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारली आहे. विक्कीच्या अभिनयाचं सर्वच क्षेत्रांतून कौतुक होत आहे. अशातच विक्कीसोबतच त्याच्यासोबत 'छावा'मध्ये झळकलेल्या सहकलाकारांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. 'छावा'मध्ये अनेक मराठमोळे चेहेरे पाहायला मिळाले. त्यातील काही ओळखीचे होते, तर काही नवखे... पण सारेच अभिनयाच्या कसोटीवर खरे उतरले. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट करुन 'छावा'मध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा अभिनेता म्हणजे, एका दिवंगत अभिनेत्रीचा मुलगा आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'छावा'मध्ये संतोष जुवेकर, आशिष पाथोडे, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, नीलकांती पाटेकर यांच्यासोबतच अभिनेता शुभंकर एकबोटेही झळकला. 'छावा'मध्ये शुभंकर एकबोटे यानं सरसेनापती धनाजी जाधव यांची भूमिका साकारली आहे. शुभंकर एकबोटे हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा. त्यानं आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आजवर त्यानं अनेक कामं केली आहेत. पण, 'छावा'मुळे मोठी संधी मिळाली असून या चित्रपटात काम करणं म्हणजे, सौभाग्य असल्याचं त्यानं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शुभंकर एकबोटे पोस्टमध्ये काय म्हणाला?
दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेनं याचा लेक शुभंकर एकबोटेनं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सेटपासून मोठ्या पडद्यापर्यंत – 'छावा' जगभरात आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. या संपूर्ण प्रवासाचा मला एक भाग होता आलं, याचा मला प्रचंड अभिमान आहे. या संपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक क्षणाला अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल लक्ष्मण उतेकर सर तुमचे खूप खूप आभार…"
"2014 मध्ये मी 'मसान' पाहिला होता तेव्हापासून प्रतिभाशाली आणि पॉवर हाऊस असलेल्या विक्की कौशलबरोबर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी मॅनिफेस्ट केलं होतं आणि ती इच्छा या निमित्तानं पूर्ण झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकी कौशल 'आमचे राजे…' माणूस म्हणूनही तो तेवढाच चांगला आहे. राजे तुमच्याबरोबर काम केल्याचा हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. मानाचा मुजरा राजे… आणि मला तुमच्याबरोबर पुन्हा-पुन्हा स्क्रीन शेअर करायला कायमच आवडेल.", असं शुभंकर एकबोटे म्हणाला आहे.
"ज्येष्ठ अभिनेते आशुतोष राणा सर, प्रदीप सर, विनीत भाई, संतोष दादा ज्यांना मी लहानपणापासून पडद्यावर पाहत आलो… त्यांच्याबरोबर आयुष्यभराचे अविस्मरणीय क्षण शेअर करण्याची संधी मिळाली याबद्दल मी त्यांचे पुरेसे आभार देखील मानू शकत नाही. भार्गव शेलार सर आणि परवेज शेख सरांच्या संपूर्ण टीमनं मला पडद्यावर लढण्यास सक्षम बनवलं यासाठी त्यांचे मनापासून आभार… माझे मित्र अंकित, आशिष, बालाजी सर, सारंग भाऊ, सुव्रत अशा चांगल्या लोकांचा सहवास या शूटिंगदरम्यान लाभला यासाठी मी आभारी आहे. दिनेश विजन सर, मॅडडॉक फिल्म्स आणि संपूर्ण छावा टीमचे मनापासून आभार… या टीमचा भाग होऊन मी धन्य झालो… 'छावा'मध्ये 'सरसेनापती धनाजी जाधव' यांची भूमिका साकारण्याची मला संधी दिली हे माझं भाग्यच आहे. मराठ्यांची गर्जना अनुभवण्यासाठी आणि आपल्या महाराजांच्या बलिदानाची, त्यांच्या अविस्मरणीय धाडसाची कहाणी पाहण्यासाठी कृपया चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पाहा… हर हर महादेव!"
दरम्यान, शुभंकर एकबोटेच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रिटींनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत शुभंकरला शुभेच्छाही दिल्या आहेत. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज करण्यात आला. रिलीज होताच विक्की कौशल स्टारर चित्रपटानं कलेक्शनमध्ये जोरदार मुसंडी मारत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
पाहा व्हिडीओ : विक्की कौशल, रश्मिका मंदानाचा Exclusive Interview
महत्त्वाच्या इतर बातम्या :