Vicky Kaushal Chhaava Box Office Collection: यंदाचं वर्ष सुरू झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे धडकले. पण, यातले काही प्रचंड गाजले, तर काही जोरदार आपटले. काही चित्रपटांना तर तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. एवढंच काय तर, या विरोधाच परिणाम सिनेमांच्या कमाईवर झाला. पण, याच गदारोळात एक सिनेमा आला, ज्याला मोठा विरोधही झाला, पण तरिही त्यानं सर्वांचा विरोध पत्करून निषेधावर मात केली आणि बॉक्स ऑफिसवरचं आपलं वर्चस्व सातत्यानं सिद्ध केलं. आम्ही ज्या सिनेमाबाबत बोलत आहोत, त्याचं नाव आहे, 'छावा'. 800 कोटींच्या कमाईसह 'छावा' या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सुपरहिट सिनेमा ठरला. 

Continues below advertisement


रिलीजपूर्वी 'छावा'नं केलेला विरोधाचा सामना 


'छावा'मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत विक्की कौशल, तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आणि मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना, अशी तगडी स्टार कास्ट दिसून आली होती. या सिनेमातील सर्वच कलाकारांचं खूप कौतुक झालं. 


पुण्यातील मराठा संघटनांनी ऐतिहासिक लाल महालाबाहेर या चित्रपटाविरुद्ध निषेध नोंदवला होता. ज्याबाबत मराठा संघटनांनी आरोप केला होता की, सिनेमाचं एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं, त्याल मराठा महाराणी येसूबाईंना नाचताना दाखवण्यात आलेलं. या गाण्यावर आक्षेप घेऊन सर्व संघटनांनी 'छावा'ला विरोध केला होता. तसेच, गाणं हटवण्याची मागणी केली होती. दिग्दर्शकांनी तात्काळ मागणी मान्य करत सिनेमातलं गाणं हटवलं. तसेच, अनेकांनी 'छावा'वर बंदी घालण्याची मागणीही केली होती. त्यानंतर 'छावा' सिनेमावरुन राजकारणंही तापलं होतं. या सिनेमामुळे औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणीही केली जाऊ लागली. मोठ्या प्रमाणावर विरोध होऊनही 'छावा' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर गाजलाही. 


'छावा' यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा सुपरहिट


'छावा' हा चित्रपट या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉलिवूड सुपरहिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं जगभरात 807 कोटी रुपये कमावले आहेत. सॅक्निल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटानं भारतात 601 कोटी रुपये कमावले आणि जगभरातील कमाई 807 कोटी रुपयांच्या पुढे गेली. एवढंच नाही तर, 'छावा' या चित्रपटानं अक्षय कुमारच्या स्कायफोर्स चित्रपटाच्या कलेक्शनलाही मागे टाकलं आणि तो या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. चित्रपटाची दमदार सिनेमेटोग्राफी आणि उत्तम कथानकानं लोकांना उत्साहित केलं. एवढंच नाही तर या चित्रपटानंतर लोकांच्या भावनाही जागृत झाल्या. त्यानंतर वातावरणात खूप बदल झाल्याचं दिसून आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली होती.


OTT वर पाहू शकता 'छावा'


थिएटरमध्ये चांगली कमाई केल्यानंतर 'छावा'नं नेटफ्लिक्सवर आपलं स्थान निर्माण केलं. जर तुम्ही दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट पाहिला नसेल, तर तुम्ही तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहू शकता. चित्रपटात विक्की कौशलचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. रश्मिका मंदाना यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंची भूमिका साकारली होती. यासोबतच, अक्षय खन्नाला औरंगजेबाच्या भूमिकेसाठी खूप कौतुक मिळालं. चित्रपटातील विनीत कुमारनं साकारलेली कविराज ही व्यक्तिरेखाही लोकांना आवडली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Jaat Worldwide Collection: सनीपाजीचा 'ढाई किलो का हाथ' जोमात, 'जाट'नं मोडला 'गदर'चा रेकॉर्ड; वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर कमाई छप्पडफाड