Veteran Filmmaker Death: साऊथ फिल्म (South Films) इंडस्ट्रीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. तमिळ सिनेसृष्टीतील (Tamil Film Industry) ख्यातनाम निर्माते के. राजन (Producer K. Rajan) यांचं निधन झालंय. 'ब्रममाचारिगल' आणि 'निनाइकोथा नालियाई' यांसारख्या सुपरहिट सिनेमांसाठी (Superhit Films) ओळखले जाणारे निर्माते के. राजन यांनी रविवारी चेन्नईतील अड्यार पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच, अड्यार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. अग्निशमन आणि बचाव सेवा विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. सैदापेट अग्निशमन केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रॉयपेट्टा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सिनेसृष्टीतील दिग्गज निर्मात्यानं अचानक असं टोकाचं पाऊल का उचललं? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.   

मीडिया रिपोर्टनुसार, के. राजन (K. Rajan)) हे रविवार, 17 मे रोजी चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडिया आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सर्वत्र पसरली. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून, सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. निर्माते राजन यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर येत आहे.

खरंच आत्महत्या की, घातपात? (Veteran Filmmaker K. Rajan Suicide)

तमिळ सिनेसृष्टीचे दिग्गज फिल्ममेकर के. राजन यांच्या निधनाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. कुणी म्हणतंय की, त्यांनी आत्महत्या केली, तर कुणी म्हणतंय की, त्यांच्यासोबत काहीतरी दुर्दैवी घडलंय. निर्माते के. राजन यांच्या निधनाबाबत माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक त्यांच्या निवासस्थानी दाखल झालं. त्यांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अद्याप त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण उघड केलेलं नाही. याशिवाय, पोलिसांनी असंही स्पष्ट केलंय की, जर त्यांनी खरोखरंच आत्महत्या केली असेल, तर असं टोकाचं पाऊल उचलण्यास त्यांना कोणी किंवा कोणत्या गोष्टीनं भाग पाडलं असावं.

अभिनेत्रीनं व्यक्त केलेलं दुःख

फिल्ममेकर के. राजन यांच्या निधनाची बातमी समजताच, अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक इमोशनल पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिलंय की, "अत्यंत दुःखद बातमी... आमच्या सिनेसृष्टीतील एक अत्यंत प्रिय सदस्य, निर्माते के. राजन सर... यांच्या निधनाचं वृत्त समजताच मला मोठा धक्का बसलाय. त्यांनी स्वतःचं जीवन संपवण्याचा घेतलेला निर्णय खरोखरंच शोकांतिका आहे. ते एक अत्यंत आदरणीय व्यक्ती होते, ज्यांनी सत्य बोलताना कधीही संकोच केला नाही. हे खरोखरंच हृदयद्रावक आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो..."

त्यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झालीय... 

दरम्यान, निर्माते जी. धनंजयन यांनीही एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिलंय की, "निर्माते आणि वितरक थिरू के. राजन सर यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याची बातमी ऐकून मला तीव्र धक्का बसला आहे. हे सर्व अविश्वसनीय वाटतं, कारण माझ्या आजवरच्या परिचयातील सर्वात धाडसी आणि आत्मविश्वासू व्यक्तींपैकी ते एक होते. ते अत्यंत उत्साही होते आणि आपली स्पष्ट मतं मांडताना त्यांनी कधीही माघार घेतलेली नाही. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याची उणीव तमिळ चित्रपटसृष्टीला प्रकर्षानं जाणवेल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dr.Anand Nadkarni Passes Away: 'शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट' काळाच्या पडद्याआड! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन