Veen Doghantli Hi Tutena Zee Marathi Serial: गेल्या काही दिवसांपासून 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेला प्रेक्षकवर्गाकडून उत्स्फूर्त मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका अनेक रंजक वळण घेत आहे. मालिकेतील मुख्य पात्र तेजश्री प्रधान ही स्वानंदीची भूमिका साकारत आहे. स्वानंदी या मालिकेत चिंगी आणि अंशुमनबाबत एक मोठा खुलासा करते. चिंगी अंशुमनच्या बाळाची आई होणार, असं स्वानंदी म्हणते. यामुळे अंशुमनचे लग्न तुटते. लग्न तुटल्यानंतर समर अंशुमनवर भडकतो. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
यावेळेस स्वानंदी चिंगीची बाजू घेताना दिसते. दरम्यान, समरच्या बहिणीच्या आयुष्यात नवं वादळ येणार आहे. समरची बहीण अधिरा, तिची सासू तिला बाळाबाबत विचार करण्यास सांगत असते. परंतु, अधिराला इतक्यात बाळ नको असतं. सासूला मुल हवं असतं पण, अधिरा यासाठी वेळ मागते. या कारणामुळे घरात प्रचंड भांडणं होतात. दरम्यान, या ठिकाणीही स्वानंदी अधिराच्या बाजूने असते. तसेच स्वानंदी आईला समजावते.
स्वानंदी अधिराच्या सासूला समजावण्याचा प्रयत्न करते (Swanandi Supports Adhira)
याचा प्रोमो झी मराठी वाहिनीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. अधिराची सासू अधिराला मुलाचा विचार करण्यासाठी सांगते. पण अधिराला नको असल्याने ती नकार देते. यानंतर स्वानंदी आपल्या आईला म्हणजेच अधिराच्या सासूला समजावण्याचा प्रयत्न करते. स्वानंदी आपल्या आईला, 'शरीर तिचं आणि आयुष्य तिचं.. मुल कधी आणि कुठल्या परिस्थितीत घालावं हा चॉइस आईचा आहे'. यानंतर अधिराची सासू, 'म्हणजे तुला काय म्हणायचे की, मुल होऊ द्यायचे नाही?' असा प्रश्न त्या स्वानंदीला विचारतात. त्यावर स्वानंदी, 'अजिबात नाही, असं मला अजिबात म्हणायचं नाही, मुल व्हावं की नाही व्हावं हा सर्वस्वी निर्णय आईने घ्यायला हवा', असं स्वानंदी म्हणते.
या मालिकेच्या प्रोमोला 'आई व्हावं की नाही, ह्या निर्णयात स्वानंदी ठामपणे अधिराच्या बाजूने!', असं कॅप्शन देत शेअर करण्यात आलं आहे. सध्या या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
