Varsha Usgaonkar on Husband Ajay Sharma: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं. मराठीसह हिंदी सिनेसृष्टी त्यांनी गाजवली.  वर्षा उसगांवकर प्रोफेशनलसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी आपल्या पतीबद्दल सांगितलं. वर्षा उसगांवकरांचे आपल्या पतीसोबत फार कमी फोटोज इंटरनेटवर पाहायला मिळतात. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगांवकर यांनी आपल्या पतीबद्दल भाष्य केलं आहे. वर्षा उसगांवकर यांचे पती नेमकं कोण आहेत? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

पतीबाबत वर्षा उसगांवकर नेमकं काय म्हणाल्या? (Varsha Usgaonkar on Husband Producer Ajay Sharma)

वर्षा उसगांवकर यांनी अलिकडेच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यासह आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही किस्से उघड केले. वर्षा उसगांवकर यांनी या मुलाखतीत आपल्या पतीबद्दलही सांगितले.  वर्षा उसगांवकर यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या खोलीतील काही फोटोज दाखवले. यावेळी त्यांनी आपल्या पतीचाही फोटो दाखवला. वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, 'हा माझ्या मिस्टरांचा फोटो आहे. त्यांना जास्त फोटो काढायला आवडत नाही.  ते प्रोड्यूसर - डिरेक्टर आहेत.  त्यांना बिहाईंड द कॅमेरा राहायला आवडतं'.

'जेव्हा मी बिग बॉसमध्ये होते, तेव्हा सुद्धा मला ते भेटायला आले नव्हते.  फक्त माझी बहीण आली होती', असं वर्षा उसगांवकर म्हणाल्या. आपल्या पतीची ओळख सांगताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, 'हे माझे पती अजय शर्मा. लेजेंड संगीतकार रवि शर्मा हे त्यांचे वडील होते. जवळ जवळ 250 चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. एका फॅमिली वेडिंगमध्ये गेलो होतो, तेव्हा माझा आणि मिस्टरांचा हा फोटो काढला होता.  त्यानंतर हा फोटो आम्हाला पाठवण्यात आला', असं  वर्षा उसगांवकर म्हणाल्या.

Continues below advertisement

'माझे पती कार्यक्रमांना विशेष येत नाहीत. त्यांना स्वत:चे फोटोज काढायला नाही पण फोटोग्राफी करायला आवडते. माझे सगळ्यात सुंदर फोटोज त्यांनी काढले आहेत', असं   वर्षा उसगांवकर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Singer Rimi Tomy Second Marriage: प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा