Varinder Singh Ghuman death:व्यावसायिक शरीरसौष्ठव म्हणून ओळखले जाणारे अभिनेते आणि बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा को-अॅक्टर बॉडीबिल्डर वरिंदर सिंह घुमनचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं असून ते 53 वर्षांचे होते. वरिंदरच्या निधनानं पंजाबी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी आणि मित्रांनी दु: ख व्यक्त केले आहे पण आता त्यांच्या एका मित्राने या प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. गुरुवारी अमृतसरमधील फोर्टिस रुग्णालयात ऑपरेशन दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. घुम्मनचा मृतदेह निळा पडला होता आणि रुग्णालय प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्याच्या मित्रांचा आहे.
वरिंदर सिंग घुम्मन बायसेप्सला दुखापत झाल्यानंतर एका छोट्या ऑपरेशनसाठी अमृतसरच्या फोर्टिस रुग्णालयात गेले होते. ही किरकोळ शस्त्रक्रिया असल्याने त्याला त्याच दिवशी परत यावे लागले. पण त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. घुम्मनचे मॅनेजर यदविंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांना प्रथम खांद्यात दुखू लागले आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात जावे लागले.
वरिंदरसिंग घुम्मन यांच्या मृत्यूचे कारण
गुरुवारी अमृतसरमधील फोर्टिस रुग्णालयात ऑपरेशन दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. घुम्मनचा मृतदेह निळा पडला होता आणि रुग्णालय प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्याच्या मित्रांचा आहे. या प्रकरणी मित्र आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला. डॉ. अनिकेत म्हणाले की, शस्त्रक्रियेदरम्यान आणि नंतर दिलेल्या सर्व औषधांची नोंद फाईलमध्ये आहे. बॉडीबिल्डर वरिंदर सिंह घुमन एका मायनर ऑपरेशनसाठी अमृतसरच्या फोर्टिस रुग्णालयात आलेले. शस्त्रक्रिया छोटीशी आणि अगदी मायनर असल्यामुळे तो एकटाच रुग्णालयात आलेला. त्याला ऑपरेशननंतर काही तासांतच डिस्चार्जही दिला जाणार होता. पण, अचानक शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं.
मित्रांनी केली सीसीटीव्हीची मागणी
जेव्हा वरिंदर सिंह घुम्मन यांच्या मित्रांनी रुग्णालयाकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली, तेव्हा प्रशासनाने सांगितले की ऑपरेशन थिएटरमध्ये कॅमेरे नाहीत, फक्त बाहेरील भागाचेच फुटेज उपलब्ध आहे. त्यानंतर प्रशासनाने मित्रांना सीसीटीव्ही रूममध्ये नेऊन उपलब्ध माहिती दाखवली. सध्या या प्रकरणी पोलिस किंवा कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
वरिंदर सिंग घुम्मन यांचा पुतण्या काय म्हणाला?
वरिंदर सिंग घुम्मन यांच्या पुतण्याने सांगितले की, "हात फुगलेला आणि धडधडत होता, त्यामुळे ते स्नायूंच्या शस्त्रक्रियेसाठी अमृतसरच्या फोर्टिस रुग्णालयात गेले होते. घुम्मनचे मॅनेजर यदविंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांना प्रथम खांद्यात दुखू लागले आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात जावे लागले.
वरिंदर सिंह घुमन कोण?
वरिंदर सिंह घुमन भारताचा पहिला वेजेटेरियन प्रोफेशनल बॉडी बिल्डर आणि अभिनेता होता. घुमनने 2009 मध्ये मिस्टर इंडियाचा खिताब जिंकलेला आणि त्याला मिस्टर एशियामध्ये दुसरं स्थान मिळालेलं. त्यानं 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'कबड्डी वन्स मोर' सिनेमातून पंजाबी फिल्म्समधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यानं 'रोर: टाइगर्स ऑफ द सुंदरबन्स' (2014) आणि 'मरजावां' (2019) यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलंय.