Vandana Gupta Rikshaw Driver Fight: वंदना गुप्ते (Vandana Gupte). मराठी सिनेइंडस्ट्रीत (Marathi Industry) त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चं नाव गाजवलं. मालिका असो किंवा चित्रपट त्यांच्या अभिनयाला काही तोड नाही. नाट्यविश्वातही त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. काही वर्षांपूर्वी रिलीज झालेला 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) या सिनेमात त्या झळकल्या होत्या. त्यांची व्यक्तीरेखा लक्षवेधी ठरली. अलिकडेच त्यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी रिक्षावाल्यासोबत आलेला वाईट अनुभव शेअर केला. वंदना गुप्ते यांनी रिक्षावाल्याला कसे सणसणीत उत्तर दिलं? नेमका किस्सा काय? जाणून घेऊयात.
अभिनेत्री वंदना गुप्तेंनी रिक्षावाल्यासोबत आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला (Vandana Gupte Opens Up About Rickshaw Drivers Verbal Abuse)
मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. केवळ नाटक नसून, त्यांनी मालिका आणि सिनेमातही उत्तम कामगिरी केली. त्यांनी अभिनयाच्या जोरावर आपलं नाव गाजवलं. वंदना गुप्ते या बिनधास्त अभिनेत्री आहेत. त्यांचे आपण अनेक किस्से ऐकत आलो आहोत. अलिकडेच त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी मालिका असो किंवा नाटक अनेक किस्से शेअर केले. त्यांनी रिक्षावाल्यासोबत आलेला वाईट अनुभवही शेअर केला.
वंदना गुप्ता म्हणाल्या की, 'मला असं वाटतं की, रिक्षावाले खूप बेधडक लोक असतात. आपल्या राज्यात जी काही भाषेवरुन मोहिम सुरू आहे, ती मोहिम अगदी योग्य आहे. कारण अशा लोकांना ताळ्यावर आणणं खूप गरजेचं आहे', असं अभिनेत्री म्हणाली. रिक्षावाल्यासोबत आलेला अनुभव सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या की, 'घटनेच्या दिवशी मी प्रयोग करुन येत होते. मी तातडीने निघाले कारण रात्री मला अमेरिकेला जायचं होतं. तिथे दौरा होता. शिवाजी मंदिरातील प्रयोग केला. रात्री दीड वाजेपर्यंत एअरपोर्टला पोहचायचं होतं'.
'मी माझी चारचाकी घेऊन निघाले. तेव्हा माझ्यासोबत सुधीर बर्वे देखील होते. त्यावेळी एसी चारचाकी नव्हत्या. मी चारचाकीची काच उघडली होती. त्या दिवशी मी एका रिक्षावाल्याला ओव्हरटेक केलं आणि पुढे निघून गेले. त्या रिक्षावाल्याला कदाचित या गोष्टीचा इतका राग आला की, त्याने जोरात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. माझ्या चारचाकीची काच उघडी असल्याकारणाने मला रिक्षावाला नेमका काय म्हणाला हे ऐकू आलं. सातांक्रुझ पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या डिव्हायडरच्या इथे मी त्याच्या रिक्षासमोर गाडी आडवी घातली'.
'रिक्षावाला खाली उतरला. 'तू मला काय म्हणालास?' असा मी त्याला प्रश्न विचारला. त्याने उद्धटपणे मला उत्तर दिले. 'मैंने क्या बोला?' असा तो म्हणाला. रिक्षात एक पॅसेंजर होतं. मी त्यांना विचारलं की, रिक्षावाला मला नेमकं काय म्हणाला? ते म्हणाले की, 'खूप चुकीचा बोलला तुम्हाला..' मग रिक्षावाल्याने जी शिवी दिली, ती मी शिवी बोलून दाखवली, आणि 'असं तू का म्हणालास?' असा प्रश्न विचारला. मग मला तो म्हणाला की, 'तुम मेरे गाडी के सामनेसे कैसे गये...'. मग रिक्षातील पॅसेंजरला खाली उतरवलं आणि रिक्षा तिरपी करुन खाली अलद पाडली. नंतर मी पुढे गेले, कारण मला पोलीस स्टेशनमध्ये जायला वेळ नव्हता. तिथल्या तिथे मी त्याला सणसणीत उत्तर दिलं', असं वंदना गुप्ते मुलाखतीत म्हणाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
