Vachan Dile Tu Mala Marathi Serial: नाटक, सिनेमा, मालिका असो किंवा वेबसीरिज  या चारही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे वैभव मांगले. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या, लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा तो छोट्या पडद्यावर एका महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘वचन दिले तू मला’मध्ये वैभव मांगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या भूमिकेत झळकणार आहे.

Continues below advertisement

दमदार अभिनेत्याची नवी जबाबदारी

वैभव मांगले मुळचा कोकणातील असल्यामुळे कोकणी, मालवणी आणि वऱ्हाडी या तिन्ही बोलीभाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. मात्र ‘वचन दिले तू मला’ मालिकेतील त्याचे पात्र बेळगावी पार्श्वभूमीचं असल्यामुळे या भूमिकेच्या निमित्ताने तो बेळगावी भाषेचा गोडवाही अनुभवणार आहेत. ही बाब त्यांच्या अभिनयात आणखी एक वेगळा रंग भरणारी ठरणार आहे.

Continues below advertisement

‘जगन्नाथ गुडपल्लीवार’ नेमकं कसं आहे हे पात्र?

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार हे पात्र सर्वसाधारण पोलिस अधिकाऱ्यापेक्षा वेगळं आहे. वैभव मांगले या पात्राविषयी सांगताना म्हणाला, “हे पात्र खूप वेगळं आहे. अतिशय इमानदार आहे असं थेट म्हणता येणार नाही. पण जेव्हा खरंच अन्याय होतो, तेव्हा पीडिताला न्याय मिळवून द्यायची त्याची पूर्ण तयारी असते. गुन्हेगारांकडून गुन्हा कबूल करून घेणं ही त्याची खास हातोटी आहे.”

 तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि सिस्टीमची जाण

तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अनुभव आणि सिस्टीम कोळून प्यायलेला अधिकारी म्हणून जगन्नाथ गुडपल्लीवारची ओळख आहे. कायद्याच्या चौकटीत राहून, प्रसंगी स्वतःची पद्धत वापरत तो गुन्हे उकलतो. या सगळ्या बारकाव्यांमुळे हे पात्र साकारताना वैभव मांगलेला  वेगळाच अनुभव मिळत असल्याचं त्याने सांगितलं.

प्रेक्षकांसाठी खास आकर्षण

दमदार संवाद, वेगळी देहबोली आणि ठसकेबाज अभिनयामुळे हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वास वैभव मांगले व्यक्त करतात. त्यामुळे ‘वचन दिले तू मला’ मालिकेत येणारा हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे.‘वचन दिले तू मला’ दररोज रात्री 9.30 वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.