एक्स्प्लोर

Upcoming Marathi Movie Vada Pav: 'वडापाव'मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी; प्रसाद ओकच्या अभिनयाची 'शतकपूर्ती'

Upcoming Marathi Movie Vada Pav: 'वडापाव' सिनेमाचा टीझर अत्यंत सुटसुटीत आहे. धमाल मनोरंजन आणि कौटुंबिक मूल्यांचा संगम असलेली ही कथा प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे.

Upcoming Marathi Movie Vada Pav: वडापाव (Vada Pav) म्हटलं की जिभेला पाणी सुटतं. वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो, अगदी तसाच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती नाती खरी रंगतदार होतात. अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट 'वडापाव' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरवरून हा चित्रपट एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असणार हे स्पष्ट होतंय. ही रुचकर पाककृती प्रसाद ओक (Prasad Oak) प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. 

विशेष म्हणजे, हा चित्रपट प्रसाद ओक यांच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट असल्यामुळे ते पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेते अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे हा प्रवास अधिकच संस्मरणीय ठरणार आहे.

टीझर अत्यंत सुटसुटीत आहे. धमाल मनोरंजन आणि कौटुंबिक मूल्यांचा संगम असलेली ही कथा प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनर अंतर्गत, प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाचे अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत. तर सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल असून संजय मेमाणे हे चित्रपटाचे छाया दिग्दर्शक आहेत. तर सिद्धार्थ साळवी यांनी चित्रपटाचं लेखन केले आहे.

दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, "वडापाव' एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतेच. हाच आमच्या चित्रपटाचा गाभा आहे. कुटुंब, त्यांच्या नात्यांतील गोडवा-तिखटपणा आणि त्यातून मिळणारा भावनिक व विनोदी अनुभव अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडावा, असाच आमचा प्रयत्न आहे."

'वडापाव' ही कथा प्रेक्षकांच्या मनात नात्यांची खरी चव रुजवेल : निर्माते अमेय खोपकर

निर्माते अमेय खोपकर म्हणतात, "मराठी प्रेक्षक कौटुंबिक चित्रपटांवर नेहमी प्रेम करतात. 'वडापाव' ही कथा त्यांच्या मनात नात्यांची खरी चव रुजवेल. टीझरवरूनच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आलं, हेच आमचे पहिले यश आहे. हा सिनेमा हसवणार, रडवणार आणि विचार करायलाही लावणार."

निर्माते निनाद बत्तीन म्हणतात, "वडापावचा जसा घरातील तीन पिढ्या मनसोक्त आस्वाद घेतात तसाच आमचा चित्रपट ‘वडापाव’ तीन पिढ्यांची गोष्ट सांगतो. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. तो घराघरांत पोहोचेल आणि लोकांना आवडेल यात शंका नाही."

निर्माते अमित बस्नेत म्हणाले, "मी मुळात नेपाळचा असून मला मराठी संस्कृती, खाद्यपदार्थ, साहित्य, कला यांबद्दल नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. यापूर्वी मी 'लंडन मिसळ' या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि आता ‘वडापाव’ची निर्मिती करत आहे. मराठी खाद्यपदार्थ हे मुळात भावनांशी जोडले गेलेले आहेत. वडापाव त्यापैकीच एक. जीवनात आपुलकीसोबत थोडा तिखटपणा हवाच. नाहीतर नातं फिकं पडतं. हाच बॅलन्स दाखवणारा हा चित्रपट आहे. टीझर पाहूनच प्रेक्षकांना जाणवलंय की, ही कथा अगदी त्यांच्या घरासारखीच आहे. ओळखीची, तरीही नव्या चवीची."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ashok Mama Colours Marathi Serial Track: अगदी सुबक अन् रेखीव, अशोक मामांनी स्वतःच्या हातानं घडवली शाडूची गणेशमूर्ती; PHOTOs

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20 Contestants List: आता होणार धमाका! 'बिग बॉस 20'चा आज ग्रँड प्रीमिअर, 18 स्पर्धकांची यादी समोर, तुमचा आवडता कलाकार कोण?
आता होणार धमाका! 'बिग बॉस 20'चा आज ग्रँड प्रीमिअर, 18 स्पर्धकांची यादी समोर, तुमचा आवडता कलाकार कोण?
Kangana Ranauts Janmashtami: कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
कंगनाने गोकुळ जन्माष्टमीचा नैवेद्य बनवला, नेटकऱ्यांनी गॅस पेटवण्यावरुन ट्रोल केलं; अभिनेत्री भडकली, दिलं सणसणीत उत्तर
Akshay Kumar and Shilpa Shetty: अक्षय कुमार अन् शिल्पा शेट्टी लग्न करणार होते? मग बिनसलं कुठं? चित्रपट निर्मात्याने उलगडला भूतकाळ
अक्षय कुमार अन् शिल्पा शेट्टी लग्न करणार होते? मग बिनसलं कुठं? चित्रपट निर्मात्याने उलगडला भूतकाळ
Mallika Sherawat & Prakash Surve: मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
Embed widget