Usha Nadkarni: अभिनेत्री उषा नाडकर्णी कायमच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात.  काही दिवसांपूर्वी इंडस्ट्रीबद्दल बोलताना आलेल्या अनुभवांविषयी सांगितलं होतं. आता नुकतंच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही बोलल्या आहेत. उषाताई आता 79 वर्षाच्या आहेत. पण त्यांची ऊर्जा कामावरील निष्ठा आणि मोकळा स्वभाव कायमच चाहत्यांच्या लक्षात राहणारा असतो. पडद्यावरचा दमदार भूमिका सडेतोड बोलायची सवय आणि प्रसंगी वादग्रस्त ठरणारी विधान या सगळ्यामुळे उषा नाडकर्णी कायम चर्चेत असतात. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्यातील खास आठवणी त्यांनी सांगितल्या.  

Continues below advertisement

चार बायका एकत्र राहू शकत नाहीत...

आजकाल लग्न झाल्यानंतर नवरा बायको वेगळं राहायचं की एकत्र कुटुंबात राहायचा हा प्रश्न निर्माण होतो. उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नानंतर त्यांच्या कुटुंबात काय परिस्थिती होती याची एक आठवण सांगितलीय. त्या म्हणाल्या, त्या म्हणाल्या, त्यांना मोठं कुटुंब भरलेलं घर आवडायचं. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या मिस्टरांना मी आपण सगळे एकत्र राहूया असं म्हणाले होते. तेव्हा माझं चुलत सासरे होते. मी त्यांच्या घरात वाकोल्याला राहायचे. ते म्हणाले विंगड विंगड राबते. म्हणजे वेगवेगळे रहा. त्यामुळे प्रेम राहतं. एकत्र राहिलं की याच्या बायकोने सांगितलं म्हणून हे... ते कर... याच्यात भांडण होतात. माझे चुलत सासरे आता गेले. त्यांनी सांगितलेली गोष्ट आता मला आठवते. उषाताई पुढे म्हणाल्या, आता मलाही तेच वाटतं की एकत्र राहून राहून कुरघोड्या निघतात. चार पुरुष एकत्र राहू शकतात पण बायका राहू शकत नाहीत. भांडणही होतात. मग एकमेकांची तोंडं बघत नाही . त्यापेक्षा प्रेमानं रहावं . असं त्या म्हणाल्या.

 'आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणाचं चांगलं बोललं की..

काही दिवसांपूर्वी उषा नाडकर्णी म्हणाल्या होत्या की,  "आता मी मुद्दामच बोलते .कारण आता माझं वय झालंय .मी कधीही गचकेन..त्याआधी बोलून घेते. आमच्या इंडस्ट्रीत कोणाचं जर चांगलं बोललं गेलं तर जो काही जळफळाट होतो त्यांचा . आणि हे लोक माझ्याबद्दल बोलतात .पण त्या नालायक लोकांना का कळत नाही की, मी जर वाईट असते मी कोणाला छळलं असतं, त्यांना एवढी अक्कल नाही की आज या बाईची 75 होऊन गेली आहे. तरी ती एवढी वर्ष काम करते .आजही काम करतेय. ज्या लोकांना काम नाहीत, मला कोण बोलवेल अशा आशाळभूत नजरेने फिरत असतात . मी ते ही करत नाही . माझा कोणी पीआर नाही .माझा कोणी मॅनेजर नाही .मला हिंदीतही काम मिळतात .मराठीतही मिळतात .मी अजून काम करते . मला हे बोलायला मिळत नाही कुठे ..

Continues below advertisement

मास्टर शेफमध्ये गेल्यानंतर मला लताबाईंचा फोन आला .तुझ्यावर सगळे इतकं प्रेम करतात मग मराठीत का काम करत नाहीस असं विचारलं . त्यावर मी म्हटलं मराठीत काम नाही मिळत .तिथे उभ्या उभ्या बसायचं . 'ती अशी आहे ..ती तशी आहे ' असं सांगत बसायचं . असं अभिनेत्री उषा नाडकर्णी म्हणाल्या .