Usha Nadkarni : "मी सगळ्याच सिनेसृष्टीत रमते. पण मराठीतील काही ठिकाणचं पाहते तेव्हा नको वाटतं. मग वाटतं आपण आपलं काम करु. संपलं म्हटले की घरी जाऊ .. हिंदी सिनेसृष्टीत प्रेम करतात आणि तुमचं कौतुक देखील करतात. आपल्या मराठीत कौतुक नाही, जळकुटेपणा खूप आहे", असं ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) म्हणाल्या आहेत. त्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी सिनेसृष्टीतील अनेक अनुभव सांगितले.
उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) म्हणाल्या, मला एका प्रोड्युसर बाईंचा फोन आला होता. मला म्हणाल्या, उषा तू खूप छान करतेस. मात्र, मी बघितलं तिकडे हिंदीत तुला खूप प्रेम करतात. मराठी का नाही? मी म्हटलं बाई मराठीत सगळ्यांची जळते. आम्ही हिच्याबद्दल एवढं वाईट बोलतो तरी हिला कामं कशी मिळतात? माझ्याकडे कोणाचे नंबर देखील नाहीयेत. कारण मला नाटक वाल्यांशी देणंघेणं नाहीये. मला तुला फोन करुन मला काम दे, असं म्हणायचं नाहीये. माझ्याकडे दोन एक लोक असतील. बाकी कोणाचेच नंबर नाहीयेत. हिंदीवाल्यांचे देखील नाहीयेत. मला कोणाकडे काम मागत नाहीत. मला काम मिळवण्यासाठी मस्का लावावा लागला नाही.
पुढे बोलताना उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) म्हणाल्या, आत्तासुद्धा कोणाचं काम आलं आणि पैसे मिळणार नसतील तर मी सांगते दुसरीला बघा.. आपल्याला कामं मिळतात. मी बरं काम करते. मी टाकाऊ काम करत नाही. म्हणून वयाची 79 वर्षे झाली तरी काम करत आहे. काम करताना मला मरणं आलं पाहिजे. मी सचिन बरोबर काम केलेलं नाही. मी अशोक बरोबर काम केलंय.
अलका कुबल आणि माझं बोलणं व्हाट्सअॅपवर चालू असतं. कधी कधी ती फोन करते. आता मास्टरशेफ होतं. तेव्हा देखील तिने मला फोन केलेला. विक्रम भेटला की बोलायचा... विक्रमचं सगळे कौतुक करत होते, तेव्हा मी म्हटलं होतं आज तुझ्याकडून पार्टी मिळायला पाहिजे. हो बोलला.. त्याने सगळ्यांना पार्टी दिली. तेव्हा सिनेमे करताना मजा यायची, असंही उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या